श्रीक्षेत्र सिद्धटेक येथील श्री हभप छोटे माऊली यांच्या नियोजनातील भव्य दिव्य सप्ताह मध्ये हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांची किर्तन सेवा संपन्न..

श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे जगद्गुरु श्रीसंत तुकाराम यांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात चौथ्या दिवसाची कीर्तनसेवा श्रीगुरू डॉ जयवंत महाराज बोधले यांची संपन्न झाली.*
    सेवेकरिता –
*सत्य साच खरे | नाम विठोबाचे बरे*
  *येणे तुटती बंधने | उभयलोकी कीर्ती जेणें*
            *हा अभंग घेतला होता,प्रसंगी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज चैतन्य महाराज देहुकर,आदीकरून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार,गायक तथा लाखो श्रोते,हजारो टाळकरी उत्कृष्ट मृदंगवादक उपस्थित होते,त्यावेळी दौंड विधान सभेचे आमदार राहुल कुल यांच्या सौभाग्यवती कीर्तनासाठी उपस्थित होत्या.श्रीगुरुंचे हृदयस्थ मित्र श्री ज्ञानेश्वर माऊली कदम( छोटे कदम माऊली) यांच्या नियोजनातून हा भव्य सोहळा संपन्न होत आहे.*

          *श्रीसंत माणकोजी महाराज बोधले व जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज हे समकालीन संत,धामणगाव येथील विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीस्थापना माणकोजी महाराजांनी तुकोबारायांच्या हस्ते केली…याचा समन्वय साधून ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर कदम छोटे कदम  माऊलींचा तुकोबारायांच्या वैकुंठगमनानिमित्त जे उत्सव पार पाडत आहेत तदनिमित्ताने माणकोजी महाराजांचा गाथा,मूर्ती व सपोषाख सन्मान बोधले महाराजांच्या परंपरेच्या वतीने माणकोजी महाराजांचा आशीर्वादपर श्रीगुरुंनी काल सिद्धटेक येथे केला,हे भव्यदिव्य उत्सव पार पाडत असताना माणकोजी महाराज त्यांना बळ देवो आणि असेच भव्यदिव्य जागतिक कीर्तीचे आणि वारकरी संप्रदायाचा गौरव करणारे उत्सव श्री कदम माऊलींच्या हस्ते घडोत अशी सद्भावना व्यक्त केली*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed