


सोलापूर येथे श्री निर्मलकुमार फडकुले सभागृह मध्ये श्री बोधराज प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने आयोजित त्रिदिवसीय प्रवचन मालेतील कर्मयोगाचे दुसरे पुष्प गुंफताना हभप श्रीगुरु डॉ जयवंत महाराज बोधले यांनी संसारात राहून परमार्थ कडे ओढल्या जाणारा व्यक्ती हाच खरा कर्मयोगी असल्याचे सांगितले.
द्वितीय दिवसाचे प्रवचन आरंभी श्री धनश्री पतसंस्थेचे प्रमुख मा.श्री. शिवाजीराव काळुंगे सर, श्री शिवाजीराव पवार सर मंगळवेढा, श्री दत्तामामा मुळे उद्योजक सोलापूर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.



दुसऱ्या दिवसाच्या प्रवचन मध्ये हभप डॉ जयवंत जयवंत महाराज बोधले यांनी विवेक, वैराग्य ,मनन, निधीध्यास हे ज्ञानी माणसाचे लक्ष असल्याचे सांगत भगवंताने अर्जुनाने कर्मयोगाचे महत्त्व विशद करताना सांगितले की ज्ञान मिळवण्यासाठी एकांतात जावे लागते परंतु कर्म करण्यासाठी रणांगणात युद्धच कराव लागते म्हणून अर्जुना तू युद्ध करावे.
यावेळी डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांनी पाश्चात्य तत्ववेत्ता शॉपेन होउर यांचा मी पण सोडा व कर्म करा तरच देवाची एकरूप होता येत हा सिद्धांत स्पष्ट केला. तसेच विकल्प सोडा व मनमोकळे ठेवून तत्त्वज्ञान व अध्यात्माचा स्वीकार करा असे अनेक सिद्धांत व्यक्त करत श्रुती भाविकांना मंत्रमुग्ध केला.
प्रवचनमालेला सोलापूरकर भाविक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून उद्या बुधवार दिनांक 16 एप्रिल रोजी प्रवचन मालिकेची सांगता होणार आहे तरी भावी भक्तांना याचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री बौधराज प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने करण्यात आले आहे.



