आनंद व परिपूर्णता म्हणजेच श्री संत तुकाराम महाराज : हभप डॉ जयवंत महाराज बोधले.


    धनश्री परिवार आयोजित आरती मंडप प्रांगण(मनमाडकर), पंढरपूर येथील  धनश्री प्रवचनमालिकेच्या तुका झालासे कळस या विषयावरील आयोजित प्रवचन मालेतील प्रथम दिवशी श्री संत तुकाराम महाराज कोण आहेत , हे सांगताना आनंद व परिपूर्णता म्हणजेच श्री संत जगद्गुरु तुकोबाराय असल्याचे प्रतिपादन श्री संत माणकोजी बोधले महाराज यांचे वंशज हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांनी केले.


पाच दिवसीय प्रवचन मालिकेच्या शुभारंभी उद्धघटन प्रसंगी सौ.सीमाताई प्रशांत परिचारक , सु.रा.परिचारक पतसंस्थेचे चेअरमन श्री प्रकाश पाटील , माजी नगरसेविका विजया  वाडदेकर,श्री लक्ष्मण पवार ,प्रसिद्ध सर्जन डॉक्टर एम आर टकले, भूलतज्ञ डॉक्टर राजेंद्र जाधव, श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यमान हभप श्री देहूकर  महाराज,श्रीगुरु हभप प्रभाकरदादा बोधले महाराज, श्री हभप निरंजन महाराज मनमाडकर,धनश्री परिवार चे प्रमुख मा.श्री. शिवाजीराव काळुंगे सर, सौ.शोभाताई काळुंगे( चेअरमन धनश्री महिला पतसंस्था) ,सौ. राजलक्ष्मी गायकवाड काळुंगे (सी इ ओ, सीताराम आणि आष्टी शुगर ) , श्री रावसाहेब तात्या पाटील (भोसे) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
    तुका झालासे कळस या विषयावरील आयोजित प्रवचन मालेतील प्रथम पुष्प गुंफताना हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांनी तुकाराम महाराजांच्या संतत्वाची व्याख्या सांगताना वेदांत शास्त्र मधील जग , देव व संत या परिभाषा सांगताना म्हणले की , या मूळ असणाऱ्या ब्रह्मतत्व वरील अनंत असणाऱ्या कल्पना परिछिन्न स्वरूपात जेव्हा व्यक्त होतात तेंव्हा त्याला जग असे संबोधले जाते . तर मूळ असणारे ब्रम्ह तत्व जेव्हा व्यापक स्वरूपात व्यक्त होते किंवा मूळ असणारे ब्रम्ह तत्व म्हणजेच देव आहे. पण दोन्हीच्या मध्यभागी असणाऱ्या आनंदाला संत असे म्हणतात.
     संत हे अवतारी आनंददायी व परिपूर्ण असतात कारण परिपूर्ण नसणे म्हणजे अपूर्ण आणि जे अपूर्ण असतात ते अज्ञानी असतात आणि जेथे अपूर्णता,जेथे अज्ञानता तेथे दुःख असते पण संत परिपूर्ण असल्याने आनंदाचा अवतार असतो.
             यावेळी पूर्व जन्माची पुण्याई व घराण्याचे संस्कार मनुष्याला आध्यात्मिक पातळीवर उच्च अवस्था प्राप्त करून देते असते हे सांगताना तुकाराम महाराज यांचे पूर्व अवतार अगदी श्री नामदेव महाराज, श्री उद्धवजी , श्री अंगद, श्री प्रल्हाद आदींचे निरुपण करत असताना घराण्याचे संस्कार सांगताना श्री संत विश्वंभर बाबा पासून वंशावळी सांगत श्री संत बोल्होबा महाराज व कनकाई माता यांची देवाकडे
काही मागणे आम्हा अनुचित ! वडिलांची रीत जानतसे!! ही परंपरा सांगत श्री संत तुकाराम महाराज यांचा अवतार म्हणजे पूर्व जन्माची पुण्याई व घराण्याचे संस्कार असल्याचे विविध तत्वज्ञानातील संदर्भ ,दाखले देत उपस्थित भरगच्च भरलेल्या सभा मंडप मधील भाविक भक्त श्रोते सह संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध केला.तसेच दुसऱ्या दिवशी तुकाराम या नावाचं अर्थ व संबंधित जीवन चरित्र पाहणार असल्याचे सांगत पहिले प्रवचन पुष्पाची सांगता केली.
प्रवचनमाळेचा प्रस्तावना सौ.राजलक्ष्मी गायकवाड काळुंगे यांनी तर सूत्रसंचालन प्रसिद्धी कवी श्री इंद्रजित घुले यांनी केली.
सदर प्रवचन माला एल. आय. सी. ऑफीस समोरील मनमाडकर यांच्या आरती मंडप प्रांगण येथे संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत सुरू असून सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन धनश्री परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed