📰✨ चेन्नई – गोविदपूरम मधील ऐतिहासिक सोहळा ✨📰


🌸 तामिळनाडूच्या भूमीत संत परंपरेचा दिव्य वारसा 🌸
चेन्नईजवळील गोविदपूरम येथे श्री विठ्ठलदास महाराजांनी बांधलेले भव्य श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आज वारकरी भक्तीसंपन्न परंपरेचे एक उज्ज्वल केंद्र बनले आहे. 💫
१०० एकर विस्तीर्ण जागेवर वसलेले हे मंदिर ❇️ २००० गायींचा गोशाळा, ❇️ भव्य सभामंडप, ❇️ अखंड अन्नछत्र आणि ❇️ अखंड विठ्ठल नामजप यामुळे विशेष प्रसिद्ध आहे. 🙏
🌿 विशेष आकर्षण 🌿
👉 तब्बल १ कोटी रुपये खर्चून सागवानी लाकडाचा भव्य श्री विठ्ठल रथ तयार करण्यात आला आहे.
👉 या रथावर सर्व संतांच्या सुबक मूर्ती कोरल्या असून तो एक अद्वितीय कलाकृतीचा नमुना ठरला आहे.
या रथाच्या मुख्य पूजन सोहळ्याकरिता संत वंशजांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते.
🌺 सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती 🌺


संत माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज ➡️ श्रीगुरु डॉ. जयवंत महाराज बोधले (रथ पूजनकर्ता)
संत नामदेव महाराज यांचे वंशज ➡️ श्री एकनाथ महाराज नामदास
संत कबीर महाराज यांचे वंशज ➡️ श्री रघुनाथ महाराज कबीर
संत एकनाथ महाराज यांचे वंशज ➡️ श्री योगीराज महाराज गोसावी
संत तुकाराम महाराज यांचे वंशज ➡️ श्री पुंडलिक महाराज देहूकर व श्री महेश महाराज देहूकर
संत निळोबाराय महाराज यांचे वंशज ➡️ श्री काका महाराज पिंपळणेरकर
मंदिराचे मुख्य मालक ➡️ श्री विठ्ठलदास महाराज
विश्व वारकरी संस्था तामिळनाडू अध्यक्ष ➡️ श्री तुकाराम गणपती महाराज
या सर्व संत वंशजांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला दिव्य महिमा प्राप्त झाला. 🌼
💎 विशेष टीप 💎
या मंदिरात आता सर्व संतांच्या चांदीच्या पादुका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
✨ संत तुकाराम महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशज श्री पुंडलिक महाराज देहूकर यांच्या हस्ते अर्पण व स्थापित करण्यात आल्या आहेत.
✨ लवकरच संत माणकोजी महाराज यांच्या चांदीच्या पादुकाही येथे स्थापण्यात येणार असून त्याची स्थापना सद्गुरू प्रभाकरदादा बोधले महाराज यांच्या हस्ते भव्य उत्सवातून केली जाणार आहे.
🌹 या माध्यमातून तामिळनाडूमध्येही संत माणकोजी महाराजांची परंपरा सदैव जिवंत राहणार आहे. 🌹
🔔 वारकरी भक्तीसंपन्न परंपरेचे हे वैभविक पान इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल. 🔔

