
पंढरपूर / प्रतिनिधी :( दिनप्रभा)
‘कथा आणि कारण’ यूट्यूब चॅनलवर डॉ. किरण बोधले यांचे परखड विश्लेषण
महाभारतातील दुर्योधनाच्या वधामागे नेमकं कोण जबाबदार, हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. भीम, द्रौपदी, गांधारी की श्रीकृष्ण — यापैकी कोणाचा हात दुर्योधनाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला, याचं सखोल आणि धर्मशास्त्रीय विश्लेषण ‘कथा आणि कारण’ या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर डॉ. किरण बोधले यांनी मांडलं आहे.
डॉ. बोधले यांनी आपल्या व्हिडिओमध्ये दुर्योधनाच्या मृत्यूची संपूर्ण पार्श्वभूमी उलगडत, युद्धाच्या शेवटच्या टप्प्यातील घटनांवर प्रकाश टाकला. कौरव-पांडव युद्धात सर्व कौरव मारले गेल्यानंतर दुर्योधन एकटाच उरतो. भीमाशी सामना होणार हे लक्षात आल्यावर तो युधिष्ठिराकडे जातो आणि स्वतःला बलाढ्य बनवण्याचा उपाय विचारतो.

युधिष्ठिराच्या सल्ल्यानुसार गांधारीच्या दृष्टीत अपार शक्ती असल्याने, तिची दृष्टी संपूर्ण शरीरावर पडल्यास दुर्योधन अभेद्य होऊ शकतो, असा समज निर्माण होतो. त्यानुसार दुर्योधन गांधारीकडे जातो. मात्र, या संपूर्ण घडामोडींवर भगवान श्रीकृष्णांची नजर असते.
श्रीकृष्ण फुलवाला बनून दुर्योधनाला योग्य वेळी सल्ला देतात, ज्यामुळे दुर्योधनाच्या डाव्या मांडीवर गांधारीची दृष्टी पडत नाही. पुढे गदायुद्धात भीम श्रीकृष्णांच्या इशाऱ्याने डाव्या मांडीवर प्रहार करतो आणि दुर्योधनाचा अंत होतो.
या संपूर्ण कथानकानंतर डॉ. किरण बोधले यांनी महत्त्वाचा निष्कर्ष मांडला. दुर्योधनाच्या मृत्यूला ना भीम जबाबदार आहे, ना द्रौपदी, ना गांधारी आणि ना श्रीकृष्ण. दुर्योधन स्वतःच आपल्या मृत्यूला जबाबदार होता, कारण त्याचा अहंकार, दुराचार आणि अन्याय हाच त्याचा खरा शत्रू ठरला.
“माणसाला मारणारं बाहेरचं शस्त्र नसतं, तर आतला अहंकार असतो,” असा सखोल संदेश देत डॉ. बोधले यांनी कथेला तात्त्विक अधिष्ठान दिलं आहे.
सदर व्हिडिओला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, धार्मिक कथा आणि तत्त्वज्ञान यांची सांगड घालणारा हा उपक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतो आहे.
याचा व्हिडिओ आपण 👇 लिंक वर https://youtu.be/JagGU30OhVk?si=cvHxFe8WTsYVFKPj
क्लिक करून पाहू शकता आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कथा आणि कारण By डॉ किरण या यू ट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा 🙏🙏

