
संत विचार प्रबोधिनी च्या वतीने देण्यात येणारा मानाचा वै.डॉ रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन सेवा पुरस्कार पुणे येथे श्रीराम जन्मभूमीचे न्यासाचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंददेव गिरी, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील, ज्येष्ठ साहित्यिक लेखिका सौ. अरुणा ढेरे, हभप श्री राणा महाराज वासकर , प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ भावार्थ देखणे सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत सद्गुरू माणकोजी बोधले महाराज यांचे विद्यमान वंशज हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांना प्रदान करण्यात आला.

शिक्षणामध्ये संस्काराचा विचार नसल्यास शिक्षित लोकी विपरीत बुद्धीने वागतात, संस्कारहीन शिक्षण जगाला तारक नसून मारक ठरते व ते राम नाही तर रावण निर्माण करताना असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमीचे नेताजी कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंददेव गिरी यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये केले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विस्मृतीत गेलेल्या वारकरी संप्रदाय सह विविध परंपरेचा शिक्षणाबरोबर सांगड घालणार असल्याचे यावेळी सांगितले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री नरहरी चौधरी यांनी केले तर डॉक्टर पद्मश्री जोशी यांनी आभार व्यक्त केले.
