मौजे सुस्ते ता. पंढरपूर येथील श्री परमेश्वर भाऊ चव्हाण यांच्या स्वगृही वद्य एकादशी निमित्त किर्तन व जागर सेवा दि.26/03/2025 रोजी उत्साहात संपन्न . . सुस्ते येथे वै. हभप श्री दिनकरकाका बोधले महाराज यांच्या आशीर्वादातून गेल्या 30 वर्षांपासून विविध भागात वद्य एकादशी निमित्त किर्तन व जागर सेवा सुरू आहेत.
यावेळी हभप डॉ किरण महाराज बोधले यांची देव वसे चित्ती ! त्याची घडावी संगती !! या जगद्गुरु तुकबोरायांच्या अभंगावर चिंतनीय किर्तन सेवा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात श्री विठ्ठल आध्यात्मिक संस्थेच्या बाल गोपाल विद्यार्थ्यांसह झाली.. कीर्तनपूर्वी बालगोपालांच्या फुगडी पाऊली ने हरिपाठ मध्ये चव्हाणवस्ती परिसर आध्यात्मिक पातळीवर न्हाऊन गेला होता..
