मुंबई येथील मराठा आरक्षणासाठी च्या आंदोलनाला माढा आमदार श्री अभिजीत पाटील यांचा पाठिंबा.

📰 मराठा आरक्षण आंदोलनाची धग मुंबईत

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे.

👉 जरांगे यांच्या या आंदोलनाला विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही मोठा पाठिंबा मिळत आहे.

➡️ उपोषणाला सुरुवात करतानाच दोन आमदार त्यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर दाखल झाले.

माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील

धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील

या दोन्ही आमदारांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.

📌 आमदार अभिजीत पाटील यांनी मुंबईकडे रवाना होताना राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागणीसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी ठाम भूमिका व्यक्त केली होती.



⚡ जरांगे यांच्या आंदोलनाला सत्ताधारी व विरोधी पक्षातील इतर अनेक आमदार-खासदारांनीही पाठिंबा दर्शवला असून आंदोलनाची व्याप्ती अधिक वाढताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed