दिनप्रभा | सांस्कृतिक / अध्यात्मिक वृत्त

पंढरपूर :
सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस अनेक कथा ऐकतो, धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टी वाचतो; मात्र त्या घडामागील खरे कारण समजून घेण्याची संधी क्वचितच मिळते. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून डॉ. किरण बोधले यांनी ‘कथा आणि कारण’ नावाचा नवा YouTube चॅनल सुरू केला आहे.

या चॅनलच्या माध्यमातून केवळ कथा सांगण्यापुरते मर्यादित न राहता, त्या कथांमागील तत्त्वज्ञान, कर्मसिद्धांत, भक्तीचा अर्थ आणि देव आपल्या जीवनात परीक्षा का घेतो याचा सखोल शोध घेण्यात येणार आहे. “आपण अनेक कथा ऐकतो, पण त्या घडल्या तरी का? कर्माचा हिशोब कसा चालतो? भक्ती म्हणजे नेमकं काय?” अशा प्रश्नांची उकल कथा आणि कारण या चॅनलवर सोप्या आणि प्रभावी भाषेत केली जाणार आहे.

डॉ. किरण बोधले यांनी सांगितले की, अध्यात्म, जीवनमूल्ये आणि विचारप्रवर्तक कथा यांचा संगम साधत प्रेक्षकांना चिंतनशील आणि सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा या चॅनलचा उद्देश आहे.

चॅनेल लिंक https://youtube.com/shorts/NXMwjjKn8Rk?feature=share

वरील लिंक 👆वर क्लिक करून पाहा.

प्रेक्षकांनी ‘कथा आणि कारण’ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबावा, जेणेकरून चॅनलवरील नवनवीन भाग थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

— प्रतिनिधी, दिनप्रभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed