
सुस्ते ता. पंढरपूर येथे श्रीरामनवमी निम्मित आयोजित अखंड हरिनाम सप्ताह मध्ये श्री हभप आकाश महाराज देशमुख यांनी ज्यांनी मायावी दुःख रुपी संसार सोडला तोच देवाला आवडत असतो किर्तन सेवा दरम्यान सांगितले.
यावेळी हभप आकाश महाराज देशमुख यांनी
सोडिला संसार ।
माया तयावरी फार ॥१॥
धांवत चाले मागें मागें ।
सुखदुःख साहे अंगे ॥ध्रु.॥
यानें घ्यावें नाम ।
तीसीकरणें त्याचें काम ॥२॥
तुका म्हणे भोळी ।
विठ्ठल कृपेची कोंवळी ॥३॥
या जगद्गुरु तुकबोरायांच्या या अभंगावरती निरुपण करताना रुपजन्य प्रेम , संबंधजन्य प्रेम , स्वभावतः प्रेम असे शास्त्रीय प्रेमाचे प्रकार सांगत अत्यंत अभ्यासू पने अभंगाचे चिंतन मांडले.
