सुस्ते (पंढरपूर): प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मौजे सुस्ते येथे ग्रामस्थांच्या वतीने श्रीराम नवमीचे औचित्य साधून ‘अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार, २० मार्च २०२६ ते शुक्रवार, २७ मार्च २०२६ या कालावधीत श्री हनुमान मंदिर, सुस्ते येथे संपन्न होणार आहे.
श्रीसंत सद्गुरू माणकोजी महाराज बोधले (धामणगावकर) व श्रीसंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या कृपेने आणि श्रीगुरू ह.भ.प. प्रभाकर (दादा) महाराज बोधले यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडणार आहे. ह.भ.प. ॲड. डॉ. जयवंत महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली या धार्मिक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
दैनंदिन भरगच्च कार्यक्रम
सप्ताहाच्या काळात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० श्री ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, ६ ते ७ व्याख्यानमाला आणि रात्री ८:३० ते ११ या वेळेत सुश्राव्य कीर्तन सेवा होणार आहे.
प्रबोधनात्मक व्याख्यानमाला व कीर्तन सेवा
या सोहळ्यात नामवंत वक्त्यांची व्याख्याने आणि कीर्तनकारांची कीर्तने आयोजित केली आहेत:
प्रमुख व्याख्याते: प्रा. श्री. रेवण चव्हाण, ॲड. श्री. गजानन भाकरे, सौ. विनया कुलकर्णी-उत्पात, डॉ. सौ. मनीषा आंधळगावकर, प्रा. तुकाराम मस्के यांसारखे दिग्गज मान्यवर विविध विषयांवर प्रबोधन करतील.
कीर्तन सेवा: ह.भ.प. शाम महाराज भोसले, ह.भ.प. रामेश्वर महाराज जाधव, ह.भ.प. राजेंद्र महाराज कैकत, ह.भ.प. विनय महाराज काशीद, ह.भ.प. गणेश महाराज वारंगे, ह.भ.प. चैतन्य महाराज देहूकर आणि ह.भ.प. पांडुरंग महाराज पाटील यांची कीर्तने होतील.
विशेष आकर्षण: श्रीराम जन्म कीर्तन
२६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. मनोज महाराज बोधले (सर) यांचे श्रीराम जन्मानिमित्त विशेष कीर्तन होणार आहे.
सांगता व महाप्रसाद
सप्ताहाची सांगता शुक्रवारी, २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ ते ९ दिंडी प्रदक्षिणेने होईल. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. गुरुवर्य प्रभाकर दादा बोधले महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. या मंगलमयी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळ व बोधराज भजनी मंडळ, सुस्ते (ता. पंढरपूर) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ: श्री हनुमान मंदिर, सुस्ते, ता. पंढरपूर.
संपर्क: ९४३०३४७४४९, 9822856375

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed