सुस्ते ता पंढरपूर येथील अखंड हरिनाम सप्ताह ची सांगता उत्साहात

श्रीगुरु हभप प्रभाकरदादा महाराज बोधले

सुस्ते ता पंढरपूर येथे श्रीरामनवमी निम्मित आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह ची सांगता श्री हभप श्रीगुरु प्रभाकरदादा बोधले महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांच्या व भाविक भक्तांच्या उपस्थितीत झाली.

सकाळी ग्राम प्रशिक्षना दिंडी सोहळा काढण्यात आला होतो यावेळी विणेकरी , ग्रंथ दिंडी चे स्वागत औक्षण आरती करून गावातील महिलांकडून होत होते.

दिंडी च्या समारोप प्रसंगी गावातील तरुण, ज्येष्ठ सह पुरुष व महिलांनी फुगडी खेळत आनंद द्विगुणित केला.उत्साहाने अनेक भाविक सहभागी  होत होते.

दिंडी प्रदक्षिणा नंतर हभप श्रीगुरु प्रभाकरदादा बोधले महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाला सुरवात झाली , यावेळी याल तरी या रे लागे!अवघे माझ्या मागे मागे !! या अभंगवरती निरुपण करत श्रीगुरु प्रभाकरदादा यांनी सर्व भाविक भक्त , ग्रामस्थ यांना मंत्रमुग्ध केले .काल्याच्या कीर्तनंतर श्री दिलीप आप्पा घाडगे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed