सुस्ते ता.पंढरपूर येथे रामनवमी निमित अखंड हरिनाम सप्ताह

सुस्ते सप्ताह निमंत्रण पत्रिका

श्रीराम नवमी निम्मित सुस्ते ता.पंढरपूर येथे दि. 31 मार्च 2025 ते दि. 7 एप्रिल 2025 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज  ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

                सदर सप्ताह मध्ये प्रवचन ऐवजी सामाजिक  व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये श्री . प्रा. रेवण चव्हाण, प्रा.सौ.सविता दूधभाते ,श्री मनोज गायकवाड , श्री सोमनाथ गायकवाड , श्री प्रा. तुकाराम मस्के सर व सुस्ते गावातील तरुण विद्यार्थी यांच्या मनोगताने व्याख्यानमालेचे सांगता होईल तर श्रीराम नवमी निम्मित दुपारीं सामाजिक परिवर्तन विषय घेऊन भारुडे होतील.             

           सप्ताह मध्ये पुढील किर्तनकार सेवा करतील हभप श्री रामेश्वर महाराज जाधव , श्री हभप विठ्ठल महाराज आसबे, श्री हभप पांडुरंग महाराज पाटील , श्री हभप रामायणाचार्य बबन महाराज धायगुडे , श्री हभप आकाश महाराज देशमुख ,श्री हभप विजय महाराज काशिद , श्री हभप सतीश महाराज खंदारकर , श्री राम नवमी निमित्त हभप श्री मनोज महाराज बोधले तर हभप श्रीगुरु प्रभाकरदादा बोधले महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाणे सप्ताह ची सांगता होईल. तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती सद्गुरू बोधराज महाराज भजनी मंडळ सुस्ते ता.पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed