तळपायाची आग , जळजळ होणे याची  कारणे व घरगुती उपाय : आयुर्वेद तज्ञ डॉ सौ क्षितिजा बोधले

नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा, क्षितिजास सिम्पल आयुर्वेद मध्ये स्वागत आहे .ग्रीष्म ऋतूत बाहेरची उष्णता वाढली वातावरणामध्ये कोरडेपणा आला की शरीराच्या आतील ही उष्णता वाढते ,कोरडेपणा येतो आणि त्यामुळे बऱ्याच जणांना तळपायाची जळजळ होते, पायाला भेगा पडतात , पाय टेकवता येत नाहीत रात्री तर हा त्रास भयंकर जाणवतो. आयुर्वेदामध्ये यालाच पाददाह मॉडर्न सायन्स मध्ये बर्निंग फीट सिंड्रोम असं म्हणतात परंतु ऍलोपॅथीची कुठलीही गोळ्या औषध यावर उपयुक्त ठरत नाहीत. म्हणूनच हा त्रास मुळापासून बरा करण्यासाठी याची कारणे व अतिशय प्रभावी रामबाण असे तीन घरगुती उपाय आज पाहूयात.
                 कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील पित्तदोष वाढणे तसेच उष्णता देखील वाढते व रक्ताची दृष्टी आढळते. पित्त वाढण्यासाठी आहार उष्ण गुणाचे पदार्थ गरम गुणाचे पदार्थ जसे की अतिशय आंबट खारट तिखट चवीचे अति मसाला, बेकरी प्रॉडक्ट्स, आंबवलेले पदार्थ चहा कॉफी मध्यपान रात्रीचे जागरण स्क्रीन चा वापर अतिरिक्त स्ट्रेस पाणी कमी पडल्यामुळे शरीरातील द्रवांश कमी होऊन जसं जमिनीला भेगा पडतात त्याच पद्धतीने पायाला ही चिरा पडतात तसेच अतिच्यक्रमण सतत चालणं उभं राहणं यामुळे वातदोष ही बिघडतो मॉडर्न सायन्स प्रमाणे बर्निंग फिट सीन रूमचं कारण मुख्यतः पोषक घटकांची कमतरता जसं की विटामिन बी 12 डिसेम डायबिटीस न्यूरोपॅथीमध्ये देखील अशी लक्षणे आढळू शकतात.
               उपायांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निदान परिवर्जन ज्या कारणांमुळे उत्पन्न होतो ती कारण टाळणं तसंच उष्णता कमी करण्यासाठी पुन्हा उन्हाळ्यात तहानेनुसार भरपूर माठामध्ये ठेवून नैसर्गिकरित्या थंड केलेल्या पाण्याचा सेवन करावं. आहारामध्ये तूप एक ते दोन चमचे देशी गाईचं किंवा साजूक तूप हे पित्ताचा सर्वश्रेष्ठ औषध आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तसेच ते वातही कमी करतं वरण-भात पोळी दुधामध्ये टाकून रात्री झोपतानाही घेऊ शकता किमान दहा ते बारा काळे म्हणू का तासभर पाण्यात भिजवून रात्री झोपताना जेवण झाल्यानंतर बिया सकट चावून खावेत यामुळे पोटही साफ होतं उष्णता बाहेर पडते. तसंच गुलकंद आवळा डाळिंब याचही सेवन आवर्जून करावे.
             २)दुसरा त्वरित आराम देणारा पारंपारिक उपाय आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तो नित्य करावा दिनचर्येमध्येही त्याचं वर्णन आढळतं पादाभ्यंग म्हणजेच फूट मसाज उष्णता कमी करण्यासाठी शुद्धकाशाची ब्रांझ मेटल ची वाटी वापरावी. रात्री झोपताना पाय स्वच्छ धुऊन कोरडे करून शुद्ध खोबरेल तेल लावा काशाची वाटी पायांना तळपायाला घासावी किमान पाच ते दहा मिनिट हा मसाज करावा लगेचच पायांना काळसर रंग यायला लागतो हा रंग शरीरातील ॲसिड व त्या मेटलची रिएक्शन यामुळे येत असतो अगदी त्वरित आराम या उपायाने मिळतो मसाज करून झाल्यानंतर कापडाने पाय पुसून घ्या सकाळी पाय धुण्यासाठी साबणा ऐवजी बेसन पीठ हळद दुधाची पेस्ट वापरा साबणातील केमिकल शाळामुळे इरिटेशन अजून वाढू शकतं यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडून जळजळ थांबते झोपही शांत लागते.
३)तिसरा साधा सोपा उपाय म्हणजे अनवाणी पायांनी संध्याकाळी ज्या ठिकाणी भरपूर दुर्वा हाराळी आहे हिरवा गवत आहे अशा ठिकाणी किमान 15 ते 20 मिनिट चालावं शक्य नसल्यास काळी माती असेल त्या ठिकाणीही चालू शकता किंवा तळपायाला कोरफडीचा गर लावू शकता हराळीचीच पेस्ट करून लावावी चिरा भरपूर पडलेल्या असतील तर त्यासाठी शतधौतकृत ही आयुर्वेदिक क्रीम रात्री झोपतानाच वापरू शकता त्यानेही खूप फायदा मिळतो.
हीच पूर्ण सविस्तर माहिती आपल्या यूट्यूब चैनल वर उपलब्ध आहे कृतीसह सर्व माहिती तुम्हाला तिथे पाहायला देखील मिळेल त्याची लिंक आपण खाली देत आहोत तर youtube चॅनेलला नक्की भेट द्या👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed