शतायुषी भजनानंदी म्हणजे वै.श्री डमरे आप्पा :  हभप डॉ जयवंत महाराज बोधले



  *डमरे आप्पा हे नाव सद्गुरू बोधले महाराज परंपरेतील अत्यंत आदराचे नाव होय ,माणसाने आपल्या गुरू परंपरेविषयी किती निष्ठावंत असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डमरे आप्पा होय*
*आमचे पणजोबा वै पंढरीनाथ महाराज बोधले यांचा अनुग्रह लाभलेले डमरे आप्पा यांनी आमच्या परंपरेतील 5 पिढ्या पाहिल्या आहेत ,माझे आजोबा वै बजरंगबुवा बोधले महाराज यांच्याशी खूप जवळीक आप्पांची होती तसेच माझे वडील सद्गुरु प्रभाकरदादा बोधले महाराज यांचा सहवास तर आयुष्यभर आप्पाना होता . जवळ जवळ ७५ वर्षे अव्याहत आप्पानी या परंपरेची सेवा केली , गुरूविषयी निष्ठा ,भजनाविषयी प्रेम ,नवीन लोक परंपरेला जोडणे ,नवीन गावे अध्यात्ममय बनविणे , संतचरित्रा विषयी अपार श्रद्धा , अशा अंतरंग गुणासह* *स्वच्छ कपडे , योग्य आहार ,राहण्यातील टापटीप पणा , अशा बाह्य गुणासह शुद्ध पारमार्थिक जीवन जगणारे आदरणीय श्री डमरे आप्पा होय .*
  *सद्गुरू संत माणकोजी महाराज मंदिरामध्ये एकादशी जागरण ,कीर्तन ,द्वादशी पंगत या नियमांचे आग्रही असणारे डमरे आप्पा .*
*वैशाख वारी म्हणजेच देवलुटी वारी ही बोधले महाराज परंपरेची मुख्य वारी होय ,एकवेळ याच वारी मध्ये सद्गुरू प्रभाकर दादा यांनी डमरे आप्पाना कीर्तन सेवा करण्यास सांगितले होते ,मला आठवते आहे की त्यावेळी  आप्पा किर्तनामध्ये मानकोजी महाराजांचे चरित्र सांगत होते पण त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रूंच्या धारा वाहत होत्या  किर्तनामध्ये संत चरित्र सांगताना ते स्वतः त्यामध्ये रंगून जात असत*
*आमच्या फडावर पहिली चाल ही जवळा येथिल निवृत्ती अप्पांची असणार व पहिल्या चालीचे द्रुपद हे डमरे आप्पांचे असणार ,या दोन चाली मुळे कीर्तन रंगत असे ,त्यामध्ये डमरे आप्पा नाचून चाल म्हणणार त्यामुळे एक उत्साह कीर्तनात राहत असे*
*सदगुरु दादांबरोबर महाराष्ट्र कर्नाटक ,तामिळनाडू ,आंध्र प्रदेश  इत्यादी राज्यामध्ये अखंड प्रवास आप्पानी केला होता*
  *बार्शी मध्ये त्यांच्या घरामध्ये सप्ताह सुरू केला होता ,*
*तसेच बार्शीतील सर्व* *कार्यक्रमामध्ये त्यांचा मुख्य सहभाग असायचा*
*अनेक परिवार बोधले महाराज परंपरेशी जोडण्यात मुख्य भूमिका आप्पांची आहे*
*माझ्या श्रावण मास प्रवचन माले मध्ये उजव्या बाजूला खांबाला टेकून महिनाभर आप्पा प्रवचन श्रवणाला हजर असत*
  *आज खूप वाईट वाटते आहे की भगवंत मंदिरात त्या खांबाला टेकून आप्पा नाहीत* 😢😢
*आमच्या कीर्तनात ती नाचून चाल होणार नाही* 😢😢
  *तो भगवा फेटा ,ते पांढरे शुभ्र रंगीत काटाचे धोतर ,तो रेशमी सदरा ,ते भगवे उपरणे ,त्या पिळदार मिश्या ,तो कपाळावर मोठा बुक्का ,*
  *असे रुबाबदार असणारे आप्पा आज आमच्यातुन निघून गेले याचे खूप वाईट वाटते* *आहे*😢😢😢
  *आप्पा तुम्ही दाखविलेला गुरू निष्ठतेचा मार्ग ,भजनाचा मार्ग आमच्या कडून योग्य रीतीने सांभाळला जावा* *हीच श्री पांडुरंग चरणी व संत माणकोजी महाराज चरणी प्रार्थना*
*भावपूर्ण श्रद्धांजली* 😢🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed