
यशाचे चार साधे पण कठोर नियम आहेत – मागा, शोधा, ठोठावा आणि पुढे जात राहा .
हे नियम ऐकायला सोपे वाटतात, पण आचरणात आणले तर आयुष्य बदलून टाकतात.
👉 मागितलं नाही तर मिळणार कसं?
👉 शोधलंच नाही तर सापडणार कसं?
👉 ठोठावलं नाही तर दार उघडणार कसं?
आज शेतकरी असो, विद्यार्थी असो किंवा सामान्य माणूस – आपल्याला काय हवंय हेच आपण स्पष्ट सांगत नाही.
मग समाज, सरकार किंवा नियतीला तरी कसं कळणार?
आपल्या आजूबाजूला संधी असंख्य आहेत. पण आपण एकाच बंद दारावर डोकं आपटत बसतो.
दार बंद झालं की आयुष्य संपलं, असा गैरसमज करून घेतो.
खरं तर एक दार बंद होतं तेव्हाच दुसरं कुठेतरी उघडलेलं असतं.
पर्याय शोधणाऱ्याचं आयुष्य वाचतं
एका राजदरबारात दोन कैदी आणले गेले.
दोघांनाही शिक्षा – मरेपर्यंत फाशी.
एक कैदी घाबरून बेशुद्ध पडला.
दुसरा मात्र शांत बसून विचार करत राहिला.
तो म्हणाला –
“मला एक वर्ष द्या. मी घोड्याला उडायला शिकवतो.”
राजाला उत्सुकता वाटली.
एक वर्षाची मुदत मिळाली.
पहिल्या कैद्याने विचारलं –
“घोडा उडतो का कधी?”
तो म्हणाला –
“मला उडणारा घोडा महत्त्वाचा नाही,
मला जगण्याचे पर्याय महत्त्वाचे आहेत.
या एका वर्षात काहीही होऊ शकतं –
राजा मरेल,
मी नैसर्गिक मृत्यू मरेन,
घोडा मरेल…
किंवा कदाचित घोडा उडेलसुद्धा.”
👉 हा फरक आहे घाबरण्यात आणि विचार करण्यात.
लढत राहा – हाच खरा मंत्र
जे हरतात ते अयशस्वी होत नाहीत.
जे प्रयत्न करणे सोडतात ते अयशस्वी होतात.
चालत येत नसेल तर धाव,
धावत येत नसेल तर उडी मार,
उडी मारता येत नसेल तर रांगत जा,
रांगता येत नसेल तर सरपटत जा –
पण थांबू नकोस.
यश हे शेवटी थांबणाऱ्याला नाही,
पुढे जाणाऱ्यालाच भेटतं.
शिवरायांचे यशाचे गणित
छत्रपती शिवाजी महाराजांकडे फक्त ९ हजार सैन्य,
समोर ३५ हजारांची फौज.
सरळ युद्ध नाही.
कारण महाराज भावनेवर नाही, परिणामांवर निर्णय घेत.
एक कोटीचा खजिना जिंकला –
पण इथेच थांबले नाहीत.
त्यांना माहीत होतं –
बहादूर खान परत हल्ला करणार.
म्हणूनच महाराजांनी राजकारण केलं,
वकिल पाठवले,
वेळ विकत घेतला
आणि त्या चार महिन्यांत ८० हजारांची फौज उभी केली.
👉 परिणामांचा विचार करून केलेली कृती = यश.
👉 परिणामांकडे दुर्लक्ष करून केलेली कृती = अपयश.
महाराज आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेनापती का?
महाराजांचे शत्रू फक्त भारतातले नव्हते –
तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, इथोपिया, इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल…
आज १२३ देश शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र
आपल्या सैनिकी अभ्यासक्रमात शिकवतात.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीसुद्धा
आग्र्याच्या प्रसंगातून प्रेरणा घेऊन
देशांतर करून स्वातंत्र्यलढा उभारला.
आजचा बोध
शेतकरी असो वा युवक –
पर्याय शोधा. नियोजन करा. थांबू नका.
शिवाजी महाराज फसवत नव्हते,
ते दूरदृष्टीने विचार करत होते.
👉 ध्येय मोठं ठेवा.
👉 लढत राहा.
👉 पर्याय तयार ठेवा.
यश तुमच्या स्वागतासाठी उभंच आहे –
फक्त पुढे जात राहा.
✍️ संपादकीय | दिनप्रभा पोर्टल
( प्रेरणा : शिवचरित्र आणि जीवनसंघर्ष वर आधारित संग्रहित माहितीवरून लेख )
— संपादक : डॉ. किरण बोधले
📞 मोबाईल : 9730347449
