हरिभक्तिची गौरवगाथा-ह.भ.प.श्री.प्रमोद महाराज जगताप यांचा षष्ठ्याब्दिपूर्ती महोत्सव*


     

https://dinprabha.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250604-WA0015.mp4

आज पुण्यभूमी आळंदी येथे ह.भ.प. श्री. प्रमोद महाराज जगताप यांचा षष्ठ्याब्दिपूर्ती कृतज्ञता सोहळा तसेच गौरवग्रंथ प्रकाशन समारंभ अत्यंत मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या विशेष प्रसंगी सद्गुरु श्री बोधले महाराज फड परंपरेतून पूज्य सद्गुरु दादा यांच्या शुभहस्ते, हरिभक्तीपरायण पूज्य श्री प्रमोद महाराज जगताप यांचा सपत्नीक सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.या सोहळ्यावेळी पूज्य सद्गुरु दादा आणि सौ. नयनी आईसाहेब, श्रीगुरु डॉ. जयवंत महाराज बोधले व सौ. अश्विनी जयवंत महाराज बोधले, तसेच पूज्य श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांची पावन उपस्थिती लाभली.
          कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून पूज्य श्री प्रमोद महाराज जगताप यांचा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला, ज्यामध्ये त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा आणि सेवेचा समग्र आढावा सादर करण्यात आला.हा सोहळा भक्तिमय वातावरणात, कृतज्ञतेच्या भावनेने आणि सद्गुरुचरणी अढळ निष्ठेने भरलेला होता.

2 thoughts on “हरिभक्तिची गौरवगाथा-ह.भ.प.श्री.प्रमोद महाराज जगताप यांचा षष्ठ्याब्दिपूर्ती महोत्सव*”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version