सुस्ते येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह मधील श्री राम नवमी निम्मित आयोजित किर्तन सेवा प्रसंगी श्री संत माणकोजी बोधले महाराज यांचे वंशज व अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर चे अध्यक्ष हभप डॉ किरण महाराज बोधले यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्म धर्म रक्षण करण्यासाठी व अधर्म चा पराभव करण्यासाठी झाला आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी धर्म रक्षावया अवतार घेसी ! अपुल्या पाळीसी भक्तजना!! या अभंग वरती निरुपण करताना श्रीरामा सारखा राजा नाही , श्रीरामा सारखा पती नाही , श्रीरामा सारखा पुत्र नाही, श्रीरामा सारखा बंधू नाही , श्रीरामा सारखा शत्रू नाही, श्रीरामा सारखा देव नाही व श्रीरामा सारखे पवित्र असे देवाचे नाव नाही.. असे विविध मुद्दे दृष्टांतसह सांगताना सर्व परिसर मंत्रमुग्ध झाला होता.. अखेरीस सर्वांनी पुष्पवृष्टी करत भगवान श्री राम प्रभू जन्मोत्सव आनंदात साजरा करण्यात आला..यावेळी सुस्ते गावचे सुपुत्र श्री बाळासाहेब चव्हाण (उद्योगपती ) यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला.
