श्री क्षेत्र वढू बुद्रुक (संभाजीनगर) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३३६ वी पुण्यतिथी निम्मित अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता.
या सप्ताह मध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत किर्तनकार यांच्या सेवा आयोजित करण्यात आल्या त्यामध्ये हभप किशोर महाराज दिवटे , हभप प्रकाश महाराज जंजीर , हभप शेखर महाराज जांभळकर ,हभप पंकज महाराज गावडे , हभप सोमनाथ महाराज भालेराव, हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे यांच्या किर्तन सेवा झाली.
सप्ताह ची सांगता श्री संत सद्गुरू माणकोजी बोधले महाराज यांचे विद्यमान वंशज श्रीगुरु.हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप झाला.
यावेळी श्रीगुरु हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी क्षेत्र हे पंढरपूर , आळंदी , देहू प्रमाणेच वारकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र आहे कारण परकीय आक्रमण वेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे च महाराष्ट्र मधील वारकरी संप्रदाय सुरक्षित राहिला होता.देहू ते पंढरपूर श्री जगद्गुरु तुकबोरायांच्या पालखी सोहळ्याला संरक्षण देणारे व वारी ची सर्व व्यवस्थी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेली असल्याने प्रत्येक वारकऱ्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतलेच पाहिजे असे आवाहन केले. तसेच हा उत्सव आणखी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी विशेष प्रयत्न सर्वांनी मिळून करूयात असा निश्चय करण्यात आला.
