संत विचार प्रबोधनीतर्फे ज्येष्ठ किर्तनकार एडवोकेट डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांना डॉ. रामचंद्र देखणे स्फूर्ती कीर्तन सेवा पुरस्कार जाहीर


संत विचार प्रबोधनीतर्फे ज्येष्ठ कीर्तनकार अडवोकेट जयवंत महाराज बोधले यांना डॉ.रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .पुणे येथे 13 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे अयोध्या कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे यावेळी उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कामकाज मंत्री माननीय श्री चंद्रकांत पाटील ,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे ,मा. आमदार श्रीकांत भारतीय , हभप.राणा महाराज वासकर ,संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ , संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त एडवोकेट राजेंद्र उमाप यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत सन्मानचिन्ह सन्मानपत्र आणि 21000 रुपये असं पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती डॉक्टर रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version