सोलापूर येथे श्री निर्मलकुमार फडकुले सभागृह मध्ये श्री बोधराज प्रतिष्ठान आयोजित त्रिदिवसीय प्रवचन मालिकेत बोलताना हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समर्पण कर्मयोगाचे सुंदर उदाहरण असल्याचे प्रतिपादन केले.
कर्म हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे .कर्मापासून कोणीही बाजूला जाऊ शकत नाही.कर्म हे प्रत्येकाला करावेच लागते त्यामुळे प्रत्येकाने समर्पण भावनेने कर्म केले पाहिजे असे मत कर्मयोग या विषयावर आयोजित त्रिदिवसीय प्रवचन मालेतील प्रथम पुष्प गुंफताना बोलत होते.
या प्रवचन माळेचा प्रारंभ भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री शहाजीबापू पवार , श्री हभप रमेश महाराज शिवापूरकर , श्री हभप सुधाकर महाराज इंगळे ,श्री हभप गणेश महाराज शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या प्रवचनमालेचे सूत्रसंचालन सौ.रेणुका सर्जे यांनी केले तर यावेळी सोलापूर शहर व परिसरातील भाविक भक्त सहभागी होते.सदरची प्रवचन माला दिनांक १४,१५,१६ एप्रिल रोजी होणार असून यासाठी सर्व भाविक भक्त यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बोधराज प्रतिष्ठान वतीने करण्यात आले आहे.
