रोज पोट साफ होण्यासाठी तुमच्या घरातीलच खा हे  5 पदार्थ..

नमस्कार मी डॉ. क्षितिजा ,डॉ. क्षितिजा सिम्पल आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजकाल लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सर्वांमध्ये पोट साफ न होण्याची तक्रार खूपच कॉमन झालेली आहे. शरीर कायम निरोगी ठेवण्यासाठी अन्नाच्या पचनातून तयार होणारे टाकाऊ पदार्थ टॉक्सिन्स रोजच्या रोज शरीरा बाहेर जाणं म्हणजेच रोजच्या रोज पोट व्यवस्थितपणे साफ होणे खूप आवश्यक आहे. पण त्यासाठी तुम्ही कुठलंही चूर्ण घेत असाल तर ते तात्पुरताच काम करतं किंवा आतड्यांना त्यामुळे कोरडेपणा येतो म्हणूनच आजच्या भागामध्ये आपण अन्नाचे पचन व्यवस्थित करून त्याचा एंड प्रोडक्ट म्हणजेच मल हा चांगल्या रीतीने तयार करून तो सुलभरीत्या शरीरा बाहेर काढण्यासाठी म्हणजेच नैसर्गिकरित्या पोट साफ होण्यासाठी आपल्या घरामध्ये अगदी स्वस्त सहज उपलब्ध असणारे पाच पदार्थ कोणते? व ते कसे घ्यावेत ? हे पाहुयात
1. तूप देशी गाईचं किंवा ताईमध्ये घरी विरजण टाकून बनवलेला साजूक तूप रोज एक ते दोन चमचे आपल्या सर्वांच्या आहारामध्ये असावं कुठल्याही पद्धतीने पोळी भाताला लावून तुम्ही घेऊ शकता.  अन्नपचन होणं त्यातून मल बाहेर पडणं यासाठी अन्न हे आपले जठर आतडे यातून पुढे पुढे ढकलला जाणं आवश्यक असतं ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी त्याला वंगणाची गरज असते तेच वंगण या तुपामधून मिळतं. म्हणून रोज रात्री झोपताना एक कपभर गरम दूध त्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर जी पाचक मला भेदक आहे त्यामुळे आवर्जून टाका एक ते दोन चमचे तूप असं घेतल्याने पोट व्यवस्थितपणे साफ होतं कोणतीही जळजळ त्रास होत नाही आणि आतड्यांना देखील कोरडेपणा येत नाही.
2. ताक घरी बनवलेलं ताज फार काळ फ्रिजमध्ये न ठेवलेलं एक ग्लासभर ताक दुपारच्या जेवणाच्या मध्ये मध्ये घोट घोट किंवा जेवणानंतर असं घेऊ शकता पोट साफ होण्यासाठी त्यामध्ये पाचक चूर्ण म्हणजेच जिरे ओवा सुंठ बडीशेप भाजून त्यामध्ये थोडसं सैंधव टाकून ते मिक्सरला बारीक करून हे पाव चमचा चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास खूपच फायदा होतो.
3. ओवा ओवा आयुर्वेदामध्ये पाचक वातानुक म्हणजे गॅस पोटातून बाहेर काढणारा सांगितलेला आहे बऱ्याचदा गॅस अडकल्यामुळे पोट साफ होत नाही तर प्रत्येकाने जेवणानंतर आवर्जून एक सवय लावून घ्या चिमूटभर कच्चा ओवा व्यवस्थितपणे चावून खा वरून एक कप भर चांगलं गरम पाणी प्यावं त्यामुळे गॅस बाहेर पडतो व पोट देखील व्यवस्थितपणे साफ होतं.
4. काळे मनुके रोज किमान दहा ते पंधरा काळे मनुके तासभर पाण्यामध्ये भिजवून रात्री जेवणानंतर व्यवस्थितपणे बियासकट चावून खावेत यामुळे शरीरातील पित्त उष्णता कमी होऊन पोट देखील चांगल्या प्रकारे साफ होतं.
5. पेरू केळी रोज दुपारी जेवणाअगोदर किमान अर्द्धावर तास तरी आठवड्यातून दोन ते तीन दिवस एक पेरू उरलेले दोन ते तीन दिवस एक किंवा दोन केळी देशी असतील तर उत्तम आवर्जून खावी त्यामुळे पोट साफ होण्यासाठी खूप मदत होते.
6. सदरची माहिती यू ट्यूब वरील https://youtu.be/P-AWJvpWtGQ?si=6d8zOqUgwq9f_VJi
  👆 या व्हिडिओ  मध्ये पाहू शकता…
                 नक्की हे उपाय करून पहा खूप फायदा होईल व असेच अजून आरोग्य विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी युट्युब वर आपले डॉक्टर क्षितिजा सिम्पल आयुर्वेद हे चॅनेल सर्च करून सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद 🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version