*हैदराबाद गॅजेटसंबंधात आता जीआर काढून अंमलबजावनी करण्यात येणार आहे* .
सातारा आणि हैदराबाद दोन गॅजेटची सरकार करणार अंबलबजावणी करणार असून सातारा गॅजेटबाबतचा एका महिन्यात जीआर काढण्याचा मंत्री शिवेंद्रराजेंचा जरांगेंना शब्द दिला आहे. तसचे हैदराबाद गॅजेटसंबंधात आता जीआर काढून अंमलबजावनी करण्यात येणार आहे. असं जरांगेंनी सांगितलं आहे.
*मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा जीआर काढणार* ..?
मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली होती. आता मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा जीआर काढणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे.
*मराठा आंदोलक रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई खाली करतील : मनोज जरांगे*
सर्व मागण्यांची अंमलबजावणी आणि जीआर दिल्यानंतर सर्व आंदोलक रात्री 9 वाजता मुंबई खाली करतील. असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. पण जोपर्यंत जीआर मिळणार नाही तोपर्यंत इथेच बसून राहणार असंही जरांगे म्हणाले आहेत.
