सन २०२४-२५ या वर्षीच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा..
मुंबई 28 नोव्हेंबर.-
कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन,कलादान,प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक,लोकनृत्य,लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय,वाद्यनिर्मिती,झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार,नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ,संगीत संयोजन,व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी आज केली.
ज्येष्ठ पुरस्कार तीन लक्ष, युवा पुरस्कार एक लक्ष प्रत्येकी मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.सदरील पुरस्कार हे लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे आहेत.
ज्येष्ठ पुरस्कार :-
नाटक – श्री अरुण कदम (२०२५), कंठसंगीत- श्री. धनंजय जोशी (2025), वाद्यसंगीत-श्री. विजय चव्हाण (2025), मराठी चित्रपट-श्री. शिवाजी लोटन पाटील (2025), उपशास्त्रीय संगीत- उदय भवाळकर (2025), किर्तन/समाजप्रबोधन- श्री. गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025), तमाशा- श्री. कोंडीराम आवळे(2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- श्रीमती रंजना फडके (2025), लोककला- श्री. हरिभाऊ वेरुळकर (2025), आदिवासी गिरीजन-श्री. रायसिंग हिरा पाडवी (2025), कलादान- श्री. चंद्रकांत घरोटे (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा. आनंद गिरी (2024), श्री. संजीव भागवत (2025), लोकनृत्य- श्री. सुभाष नकाशे (2024), श्री. अरविंद राजपूत (2025), लावणी संगीतबारी- श्रीमती शकुंतला नगरकर (2024), श्रीमती कल्पना जावळीकर ( 2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- श्रीमती पदमजा कुलकर्णी (2024), श्रीमती गोदावरी मुंडे (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- श्री. युसुफ घडूलाल मूल्ला (2024), श्री. भालेराव नागोराव दडांजे (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- रामदास चौधरी (2024), श्री. बुधा भलावी (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- श्री. ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024), श्री. भानुदास शंभा सावंत (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था-श्री. धर्मा कांबळे (2024), श्रीमती साखराबाई टेकाळे (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट (2025), तांबवेश्वर शाहिरी कलापथक(श्री. तुकाराम ठोंबरे), बीड (2024), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- श्री अविनाश ओक (2024), श्री. महेश अंबेरकर (2025), संगीत संयोजन- श्री. अमर हळदीपूर (2024), श्री. कमलेश भडकमकर (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- श्री अंबरीश मिश्र (2024), श्री. उदय सबनीस (2025)
युवा पुरस्कार :-
नाटक -श्रीमती तेजश्री प्रधान (२०२4), श्री. भूषण कडू (2025), कंठसंगीत- श्री. धनंजय म्हसकर (2024),श्री. मयुर सुकाळे (2025), वाद्यसंगीत-श्री.ऋषिकेश जगताप (2024), वरद कठापूरकर (2025), मराठी चित्रपट-श्रीमती मधुरा वेलणकर (2024) श्री. शंतनु रोडे (2025), उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024) श्री. भाग्येश मराठे (2025), *किर्तन/समाजप्रबोधन- श्री. जयवंत बोधले (2024)* श्री. ज्ञानेश्वर माऊली कदम ( 2025), तमाशा- नितीन बनसोडे (2024), श्रीमती अमृता थोरात (2025) शाहिरी- शाहिर आझाद नाईकवडी (2024) शाहिरा अनिता खरात (2025), नृत्य- श्रीमती वृषाली दाबके (2024) श्री. संतोष भांगरे (2025), लोककला- श्री. संदिप पाल महाराज (2024), श्री. चेतन बेले (2025), आदिवासी गिरीजन-श्री. साबूलाल बाबूलाल दहिकर (2024), श्रीमती गंगुबाई चांगो भगत (2025) कलादान- श्रीमती कस्तुरी देशपांडे (2024), श्री. सिध्देश कलिंगण (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- खंडुराज गायकवाड (2024), श्रीमती तेजस्विनी आचरेकर (2025), लोकनृत्य- दिपक बीडकर (2024), गणेश कांबळे (2025), लावणी संगीतबारी- श्रीमती प्रमिला लोदगेकर ( 2024), श्रीमती वैशाली वाफळेकर (2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- श्री. हमीद सय्यद (2024), श्री. रामानंद उगले (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- श्री उमा शंकर दाते (2024), श्री. सर्वजीत विष्णू पोळ (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- मुकेश देशमुख (2024), श्री दुधराम परसराम कावळे (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- श्री. लक्ष्मीकांत नाईक (2024), श्री. रामकृष्ण कैलास घुळे (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- श्रीमती रेणुका शेंडगे जेजूरीकर (2024), श्री. प्रसाद गरुड (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- सव्यसाची गुरुकुलम श्री. लखन जाधव (2024), इतिहासाचे अबोल साक्षिदार बहुउद्देशिय ट्रस्ट (श्री. निलेश सकट) (2025), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- श्री. प्रणाम पानसरे (2024), श्री. विराज भोसले (2025), संगीत संयोजन-श्री. अनुराग गोडबोले (2024), श्री. अमित पाध्ये (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- श्रीमती मेघना एरंडे (2024), श्रीमती समिरा गुजर(2025)
वरील सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच मा.सांस्कृतिक कार्य मंत्री, ॲङ आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.
