पंढरपूर :दिनप्रभा | सांस्कृतिक / अध्यात्मिक विशेष
“प्रभू श्रीरामचंद्रांच्या वनवासाला फक्त कैकईच जबाबदार होती का?” हा प्रश्न अनेकांच्या मनात कायम असतो. याच विषयावर ‘कथा आणि कारण – बाय डॉक्टर किरण’ या YouTube चॅनलवरून डॉ. किरण बोधले यांनी आपले स्पष्ट आणि विचारप्रवर्तक मत मांडले आहे.

डॉ. किरण बोधले यांच्या मते, श्रीरामांच्या वनवासाला एकटी कैकई जबाबदार नव्हती. यामागे अनेक कारणांची साखळी होती. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे राजा दशरथांनी कैकईला दिलेले दोन वर. त्या वरांचे स्मरण मंथरेने कैकईच्या मनात विषारी बीज पेरून करून दिले आणि घटनांना वेगळे वळण लागले.

मात्र, या सर्वांहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रभू श्रीरामांचा स्वतःचा निर्णय. जर रामांनी ठरवले असते तर संपूर्ण अयोध्या त्यांच्या पाठीशी उभी राहिली असती आणि वनवास टाळता आला असता. पण रामांनी राजसत्ता नव्हे, तर धर्मनिष्ठेचा मार्ग स्वीकारला. वचनपूर्ती, पित्याचा मान आणि राजधर्म यासाठी त्यांनी वनवास स्वेच्छेने स्वीकारला.

डॉ. बोधले पुढे सांगतात की, रामराज्य हे बहुमतावर उभे राहिलेले नव्हते, तर एका धर्मनिष्ठ मतावर उभे होते. अखेरीस ही संपूर्ण घटना केवळ मानवी निर्णयांपुरती मर्यादित नसून ती कर्म आणि नियतीची ईश्वरी योजना होती, असे ते ठामपणे मांडतात.

ही मांडणी श्रीरामाच्या व्यक्तिमत्त्वातील त्याग, कर्तव्य आणि धर्मनिष्ठेचे दर्शन घडवते. त्यामुळे श्रीरामांचा वनवास ही केवळ एक ऐतिहासिक किंवा पौराणिक घटना न राहता, आजच्या समाजालाही योग्य मार्गदर्शन करणारी जीवनमूल्यांची शिकवण ठरते.

— दिनप्रभा वृत्तसेवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version