पंढरपूर | प्रतिनिधी (दिनप्रभा न्यूज पोर्टल)
बालमित्र पूर्व प्राथमिक विद्यालय, पंढरपूर येथे वार्षिक पारितोषिक वितरण व विविध कला गुणदर्शन कार्यक्रम अत्यंत उत्साही व आनंददायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास   मा. डॉ. आशालता शशिकांत कारंडे (कारंडे हॉस्पिटल, पंढरपूर), मा. सौ. अर्चना भालचंद्र पुजारी (आदर्श शिक्षिका), मा. राधा प्रभाकर कचरे (ताई) (ग्राम महसूल अधिकारी, तेलतळी), मा. श्री. अशोक बळीराम शिंदे (समाजसेवक, पंढरपूर), मा. सौ. ज्योती अशोक शिंदे (नगरसेविका, पंढरपूर नगरपरिषद) तसेच मा. डॉ. संग्राम जीविराम गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. प्रविण नगनाथ जाधव सर (संस्था अध्यक्ष, सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, पेनूर) होते.
कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य, समूहगीते, अभिनय, लयबद्ध हालचाली अशा विविध कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली.  सर्व गटांतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. प्रत्येक सादरीकरणाला पालक व उपस्थित मान्यवरांकडून भरभरून दाद मिळाली.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले “शेतकऱ्यांची व्यथा” हे सामाजिक जाणिवेचे नाट्य. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या या नाट्याने शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष, कष्ट व वेदना प्रभावीपणे मांडल्या. या नाट्यप्रयोगादरम्यान संपूर्ण सभागृह भावूक झाले असून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षणासोबत संस्कार, कला व सामाजिक जाणिवेचे महत्त्व अधोरेखित केले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. देशपांडे मॅडम, सौ. शेळके मॅडम, सौ. जाधव मॅडम, सौ. क्षीरसागर मॅडम व सौ. ढगे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version