पंढरपूर :
शिक्षकांच्या दैनंदिन जीवनावर आधारित, विनोद आणि सामाजिक वास्तव यांचा सुरेख संगम असलेले ‘शिकायला गेलो एक!’ हे तुफान विनोदी नाटक सोमवार, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता पंढरपूर येथे रंगणार आहे. प्रत्येक शिक्षकाने पाहावे असे हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच विचार करायला लावणारे ठरणार आहे.
गौरी थिएटर निर्मित व प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रस्तुत या नाटकाची मूळ कथा ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांची असून लेखन व दिग्दर्शन अहेत दादरकर यांनी केले आहे. नाटकात प्रशांत दामले प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासह हरिभाऊ शेलार, अनया भगरे, सुशील इनामदार, चिन्मय मांडकर, समृद्धी माहेर आदी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकणार आहेत.
हा नाट्यप्रयोग आरती मंडप प्रांगण, LIC ऑफिस समोर, पंढरपूर येथे होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तिकीट विक्री दि. २७ डिसेंबर २०२५ पासून कार्यक्रमस्थळी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू आहे. प्रेक्षकांनी आपली तिकिटे वेळेत आरक्षित करावीत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
संपर्कासाठी :
डॉ. मंदार सोनवणे – 9890694655
दिलीप कोरेके – 9373632211
सुनील मोहिते – 8329809009
दत्तात्रय जगताप – 9923409840
विक्रम बिडिस्ते – 9423335165
विरल नागटिळक – 9860150406
राजाभाऊ उराडे – 9422648375
शशिकांत गायकरवाड – 8805629046
विनोद शेंडे – 9623722828
ललिता कोळवडे – 7588185771
डॉ. संगिता पाटील – 9579326400
रेखा चंद्रकांत – 8275304075

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version