कोर्टामध्ये युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर वकील अमित कुमार भोसले (रा.रूकडी) हे तिथे आले. ते या ठिकाणी कोर्टामध्येच आले होते आणि त्यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला केला. पोलिसांनादेखील या ठिकाणी संशय आला नाही. कारण ते मुळात वकील आहेत आणि वकील असताना ते हल्ला करतील असं वाटलं नाही.
दरम्यान, दोन्ही बाजुंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे.
ये पश्या.. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतोस का अशा पद्धतीचं एक वाक्य बोलला आणि त्याच्यानंतर त्याने तो हल्ला केला.या हल्ल्यानंतर सगळी धावपळ उडाली. ज्या वकिलाने प्रशांत कोरटकरवर हल्ला केला, त्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
