वि चा केला ठोबा !म्हणून नाव तो विठोबा !!
का रे नेना त्याचे नाव !काही वेदासी नाही ठाव !!
शेष स्तुती प्रवर्तला !जीवा चिरोनी पलंग झालं !!
तुका म्हणे सत्ता !ज्याची काळाचीये माता!!
प्रस्तुत कीर्तन रुपये सेवेकरिता घेतलेला अभंगातून श्री संत जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला विठोबा या शब्दाचा अर्थ सांगतात देवाच्या नावाचा अर्थ सांगतात देवाचं नाव घेण्यापूर्वी त्याच्या नावाचा अर्थ कळायला पाहिजे. तुमच्या आमच्या नावाला फारसं महत्त्व नाही कारण आमचे नाव कशावरून ही आणि कशीही ठेवली जातात जन्म झाला की बाराव्या दिवशी बारसं घालून नाव ठेवतात एक लक्षात घ्या नाव ठेवणं वेगळं नाव ठेवणं वेगळं तुमच्या आमच्या बारशा दिवशी ठेवलेल्या नावाचा अर्थ नाही कळाला तरी चालेल पण देवाच्या नावाचा अर्थ कळाला पाहिजे तुमची आमची सामान्य नाव आहे घेतली काय आणि न घेतली काय याचा फायदा नाही म्हणून सामान्यांच्या तुमच्या आमच्या नावाचा विचार करण्याची गरज नाही कारण आमचं नाव व कृती वेगवेगळे असते.
दृष्टांत : एक तरुण मुलगा होता आई-वडिलांनी त्याचं नाव ठणठणपाल असं ठेवलं होतं अहो आता हे काय ठणठण पालघर नाव आहे का पण आई-वडिलांनी ठेवलेलं त्याला वाटलं आपण आपलं नाव बदलून घ्यावं म्हणून तो त्याच्या सद्गुरूंकडे गेला श्री गुरुदेव विनंती करू लागला कृपया माझं नाव बदला सद्गुरुन सांगितलं काम कर या जगामध्ये जा बाहेर फिर तुला जे कोणाचं नाव आवडेल त्याचा शोध घे आणि मग तेच नाव तू मला सांग मी तुला तेच नाव देतो तो चांगल्या नावाचे शोधात बाहेर पडलाय त्याला गावाच्या बाहेर गेल्यानंतर वाळलेल्या शेण्याच्या गोऱ्या वेचणारी एक बाई दिसली यांनी सहजच त्या महिलेला विचारलं बाई काय करत आहे भौऱ्या व्यवस्थित तुमचं नाव काय लक्ष्मीबाई मनातल्या मनात हा म्हणतोय लक्ष्मीबाई आणि गौरव्यवस्थे पुढे निघाले रस्त्यात एक त्याला भिकारी भेटले काय करतोस रे भिक मागतोय नाव काय तुमचं धनपाल मनातल्या मनात धनपालन भीक मागतो पुढे निघाला रस्त्याने अंत्ययात्रा येत होती कोणाची अंत्ययात्रा आहे त्यातल्या अंत्ययात्रेतल्या लोकांनी सांगितलं मयत झालेल्या व्यक्तीचे नाव अमरसिंग आहे मनातल्या मनात म्हणाला अमरसिंग आणि मेला तसंच माघारी आश्रमात आलं श्री गुरुंनी विचारलं मिळाले का आवडीचं नाव एखाद कशाचं काय गुरुजी आहे तेच बर आहे का कारण त्यांना सांगितलं लक्ष्मी तो उपल्या चुने!भीक म्हणजे धनपाल !अमरसिंग तो मर गया! बिचारा ठण ठण पाल!!
म्हणून तुमचे आमचे नावाचा अर्थ व कर्तृत्व वेगवेगळे असल्यामुळे त्याचा फारसा विचार करायची गरज नाही पण भगवंताच्या नामाचा अर्थात मला समजलाच पाहिजे कारण भगवंताच्या नामाचा विचार करत असताना भगवंताच्या नामाचे सामान्यतः तीन प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जाते
१) स्वरूप नाम २)दोन क्रिया नाम ३) गुण नाम
१)स्वरूप नाम : ज्या नामातून देवाचे स्वरूप व्यक्त होत त्याला स्वरूपणा मन देवाचे स्वरूप आहे
सत्य सत्य ज्ञान आनंद गगनाचे प्रावरण! नाही रूप वर्ण गुण जेथे!!
परमोत्म्याचे स्वरूप सांगण्यासाठी ज्ञानोबारायणी देवाला सत्य हेच नाव दिला आहे कारण भगवंता हा सत्य स्वरूप आहे, जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा हेच म्हणतात
सत्य साच खरे !श्री विठोबाचे नाम बरे!
२) क्रियानाम : ज्या नामातून भगवंतने केलेली क्रिया सांगितली जाते त्याला क्रिया नामाचे म्हणा उदाहरणार्थ रावणारी ( रावणाला मारणारा), कंसारी (कंसाला मारणारा).
३) गुण नाम: ज्या नामातून भगवंताचा गुणविशेष सांगितला जातो त्यांना असे म्हणातात.
उदाहरणार्थ पतीत पावन पती त्यांना पावन करणारा दीनबंधू दिनांचा बंधू आहे देणे जनाविषयी त्याच्या मनात करून बंद होत आहे म्हणून दिनबंधू देव सोयरा देव सोयरा! देव सोयरा दिनाचा!!
याप्रकारे भगवंताच्या नामाचा आपण विचार करतोय इतका विचार का करायचा कारण वारकरी संप्रदाया नामप्रदान संप्रदाय आहे म्हणून तर तुकाराम महाराज ओरडून सांगतात हक्क ऋणी सांगे तुका नाम घेता राहू नका या कारण असतो भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी त्याच्या नामाचा अर्थ समजला पाहिजे मग विठोबा या शब्दाचा अर्थ तरी काय आहे एक लक्षात घ्या भगवंताच्या नामाचा अर्थ अतीन पद्धतीने पाहता येतो देवाच्या काही नावाचा विचार हा लौकिक दृष्ट्या करावा लागतो काही नावाचा विचार लवकि को अलौकिक पद्धतीने पहावा लागतो तर काही नावाचा अर्थ फक्त अलौकिक पद्धतीने करता येतो.
काही नावाचा अर्थ लौकिकदृष्ट्या म्हणजे व्याकरणांना सोडवता येतो उदाहरणार्थ राम या नावाचा अर्थ काय होतो तर राम या शब्दात तीन अक्षर आहेत.
र+अ +म
यातला र म्हणजे ते म्हणजे अशी म म्हणजे तो म्हणजेच ते तू आहेस याला लौकिक दृष्ट्या अर्थ म्हणा किंवा दुसरा अर्थ सामान्यतः अनेक वेळा सांगितला जातो राहा कंठस्थ उच्चार आहे तर मग हा उठस्त राम म्हणताना तोंड उघडतं कंठातून उच्चार बाहेर पडतो मग म्हणताना पोट झाकले जातात तोंड बंद होतं राम म्हणताना रास शब्द उच्चारल्यावर आतलं बाहेर पडतो महा उच्चार करताना दोन मिंटल जात याला बाहेरचा परत येत नाही .
देवाचं दुसरं नाव विठ्ठल आहे याचा सुद्धा लवकि करता आणि अर्थ पाहता येतो.
वि+ठ्ठ+ल
वि कारो विधाता, ठ कारो नीलकंठ, ल कारो लक्ष्मीकांत.
तर काही नावाचा अर्थ लौकिक अलौकिक पद्धतीने पाहावा लागतो उदाहरणार्थ केशव लौकिक दृष्ट्या
क + इश + व
क म्हणजे करतारूपी ब्रह्म ,ईश म्हणजे महेश आणि व म्हणजे विष्णू.
अनोखी दृष्ट्या केशव नावाचा अर्थ नामदेव महाराज सांगतात
नामा म्हणे केशव म्हणती स्वामी ते ! नाशितो क्लेशाते म्हणोनिया !!
भगवान कृष्ण श्रीकृष्णाचे जीवनाचरित्रामध्ये श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंस आणि केशरी नावाच्या राक्षसाला पाठवलं राक्षसाच्या आधी अनेक जण मारायला गेले पण ते गेले ते गेलेच माघारी आलेच नाही कंसा दरबारात ग्रहण चर्च चालू आहे काय करावे इतक्यात केशव म्हणतो मी जातो आणि देवाला मारून येतो केशे नावाच्या राक्षसांना घोड्याचं रूप धारण केलं गोकुळात मध्यभागी चौकात आला नाचायला लागला घोडे लग्नातच नाचतात असं काही नाही घोड्यांना असतो बघायला सगळं गोकुळ आलं लहान मुल आलं पण प्रश्न काही दिसेना कृष्णाच्या लक्षात आलं हे आपलं गिऱ्हाईक आहे नाचणारा घोडा बघायला चौकात आले भरपूर गर्दी होती केसिन कृष्णाला बघितलं आणि जोरजोरात नाचायला लागलं नाचत नाचत त्याच्याजवळ जातो आणि जोरात नसतो कृष्णाला पायाखाली घेऊन तोडून मारण्याचा प्रयत्न करू लागला पण कृष्णाने जबड्यात हात घातला आणि फाडून टाकलं या केसी नावाच्या राक्षस ला मारलं म्हणून त्याचं नाव केशव. हा झाला अलौकिक पद्धतीने केशव्या नावाचा अर्थ म्हणजेच केशव या नावाचा लवकिक व लौकिक पद्धतीने अर्थ पहावा लागतो.
पण काही नावाचा अर्थ मात्र अलौकिक पद्धतीनेच पाहावा लागतो प्रस्तुत अभंगाच्या प्रथम चरणा जगद्गुरु तुकोबाराय विठोबा या शब्दाचा अलोक्विक पद्धतीने अभंगाच्या प्रथम चरणामध्ये अर्थ सांगतात.
वि चा केला ठोबा ! म्हणूनी नाव तो विठोबा !!
वी चा ज्याने ठोबा केला त्याचे नाव विठोबा हे असे तुकोबाराय म्हणतात आता वी चा ठोका केला म्हणजे काय तर आधी ठोबा म्हणजे काय ते बघू, ठोबा म्हणजे ठोंब्या ठोंब्या म्हणजे अक्कल शून्य ज्याला काही कळत नाही त्याला ठोंब्या म्हणतात मंद म्हणजेच ठोबा. आता वी चा केला ठोंब म्हणजे व्ही ला अक्कल शून्य बनवलं पण वी म्हणजे काय हे पहावं लागेल, व्ही शब्दाचा विचार तीन पद्धतीने करता येईल.
१) वि हा शब्द एक नाम आहे
२) वि हा शब्द एक धातू आहे
३) वि हा शब्द एक उपसर्ग आहे.
आता वि हा शब्द एक नाम आहे म्हणून विचार केला असता, वि म्हणजेच विहंग विहंग म्हणजेच पक्षी सर्व पक्षांमध्ये सर्वश्रेष्ठ पक्षी गरुड याचाच अर्थ गरुडाचा केला ठोबा म्हणजेच गरुडाला अक्कल शून्य जानक बनवलं तो विठोबा.
गरुडाचा अधिकार सामान्य नव्हता भगवंताचे वाहन ही ज्याची योग्यता तो गरुड, जो वाऱ्या त भरारी मारल्यानंतर ज्याच्या पंखातून सामवेदाचे शब्द बाहेर पडतात तो गरुड पण अशा ज्ञानी गरुडाला ज्याने अक्कलशून्य केलं तो म्हणजेच विठोबा प्रसंग सर्वांचे माहितीचा आहे द्वारकेतील कृष्ण व हनुमंताची भेट हनमंत्रण फिरत फिरत द्वारकेतील बागेत आले व बागेचा विध्वंस चालू केला बागेचे रक्षक आडवे आले त्यांनी त्या रक्षकाने हनुमंताकडून मार खाल्ला कोणी पळून गेलं काही जण बागेचे रक्षक बलराम दादाकडे गेले बलराम दादांनी कृष्णाला सांगितलं वानराचा बंदोबस्त कर भगवंतांनी गरुडाला सांगितलं यातून देवाला गरुडाला असणाऱ्या स्वतःच्या गतीचा गर्व , सुदर्शन चक्राला शक्तीचा आणि सत्यभामाच्या सौंदर्याचा गर्व घालवायचा होता.
जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने गरुडला वानराचा बंदोबस्त करायला बागेमध्ये पाठवायचे ठरवले तेव्हा गरुड देवाजवळ आला आणि म्हणून लागला देवा सामान्य वानर आले आणि त्याला बोलवायचं का माझ्याकडे मी सदा सर्वकाळ तुमच्या सेवेत आणि इतका हलक काम मला देता का भगवान कृष्ण परमत म्हणजे सांगितलं गरुडा तसे काही नाही जा आणि त्याला बोलून आणला शेवटी नाईलाज असतो गरुड बागेकडे गेला हणमंत्रा एका झाडावरती बसलेले होते अहंकार युक्त गरुड हनुमंत रायाच्या जवळ आले आणि म्हणाले हे माकडा माझं मालक तुला बोलवतोय हनुमंतराने विचारलं कोण तुझा मालक माझे मालकाचे नाव बलराम दादा आहे मला फक्त राम माहिती आहे हा बलराम कुठून आलाय हणमंत्रा ऐकत नाहीत म्हणून जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न गरुड करू लागला शेवटी हनुमंत रायला रागा अनावर झाला आणि हनुमंतरायांनी गरुडाच्या एक कानाखाली मारली तो गरुड रक्त ओकतच कृष्णाच्या पायाजवळ पडला कृष्ण परमात्म्याने विचारलं, आलास काय गरुडा हो त्या सामान्य वानराला नाही आणलं देवा सामान्य नाही वानर ते तूच म्हणत होतास की सामान्य वानर म्हणून देवाचे सामान्य नाही रे आणि तो यायलाच तयार नाही तू काय म्हणालास गरुडा त्याला मी म्हणालो बलराम दादांनी बोलवले आता काम कर गरुड त्याला म्हणावं अयोध्या पती प्रभु श्री रामचंद्र बोलत आहे यावर गरुड देवाला म्हणू लागला देवा खरं बोललो तर तोंडातून रक्त खोटं बोलल्यावर तर जिवंत ठेवायचं नाही ते भगवान कृष्ण परमात्म्याने पाठवून हात फिरवला सांगितलं नाही गरुडा जा मी सांगतो तुला शेवटी गरुड घाबरत घाबरत घाबरत हनुमंत रायाजवळ पोहोचला आणि म्हणू लागला हात जोडून हे कपिवारा हे कपी श्रेष्ठ आदराने तुला आमचे मालक अयोध्या पती प्रभू रामचंद्र बोलवत आहे प्रभू राम हा शब्द हनुमंत राणे ऐकला गरुडाला उचलून घेतलं आणि गोंधळायला सुरुवात केली आणि हनुमंत गरुडल म्हणतात तारीख गरुडा आधीच जर हे आधी सांगितलं असतं तर तुला कशाला मारलं असतं रे गरुडा कुठे आहेत माझे प्रभु श्रीरामचंद्र महालात चल मी आलोच गरुड घाबरत वेगाने निघाला कारण हे आलं आणि महालात जर प्रभू रामचंद्र नाही दिसले तर परत मला मारेल म्हणून वेगात निघालं तर आश्चर्य काय गरुडाच्या अगोदर हनुमंत राय दारामध्ये वेगाने हजर होते मग गरुडाच्या लक्षात आलं आपण उगीच आपल्या वेगाच्या गतिमानाचा अभिमान बाळगतोय आणि गरुडाचा अहंकार निघून गेला अशा ज्ञानी गरुडाला सुद्धा अक्कल शून्य ज्यांनी केलं तो म्हणजे तुकाराम भगवान परमात्मा तोच भगवान परमात्मा म्हणजे विठोबा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा.
आता वि शब्दाचा दुसरा अर्थ धातू म्हणून पाहिला तर वी या धातूचे चार अर्थ होतात.१) कांती,२) प्रजनन ,३) गती आणि ४)व्याप्ती.
१)कांती म्हणजे सौंदर्य सौंदर्य ला सुद्धा ज्याने शून्य केलं कारण त्याच्यासारखं भगवंतासारखं देखणं कोणीच नाही श्रीकृष्णाच्या सौंदर्य पुढे लक्ष्मी भुलूनी झाली वेडे मदनाला पोटाबा पुढे तेथे कुणीकडे इंद्र चंद्र.
राजेश सुकुमार मदनाचा पुतळा… असे अनेक प्रमाणे या दृष्टीने पाहायला भेटतील.
२) प्रजननालाही शून्य करतो जेव्हा प्रलय काल येतो तेव्हा सृष्टीतील प्रजनन थांबवतो असा जो कोणी भगवान परमात्मा आहे त्याचं नाव विठोबा आहे.
३) गतीलाही शून्यता आणली तो भगवान परमात्मा भक्तावर संकट पडल्यानंतर तो असा धावतो की गतीलाही शून्य तो प्राप्त होतो. श्रीमद् भागवतात त्याच्या गतीचा दृष्टांत म्हणजे गजेंद्ररक्षण करताना भगवान परमात्मा धावल की गतीला शून्यतून प्राप्त झालं हक्क हे तो लक्ष्मी ठीक आहे तो गजराज.
४) व्याप्तीलाही शून्यत्व केलं त्याने अहो ते सोडाच त्याचं नावच फार मोठा आहे ज्ञानोबा हरिपाठ म्हणतात
ज्ञानदेव पुसेनिवृत्तीची चाड !गगनाहुनी वाढनाम आहे !!
आता नाव एवढं आहे म्हटल्यावर तो केवढा असेल. एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहावे किंवा अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदाघरी.
आता वी चा तिसरा अर्थ म्हणजे व्ही हा उपसर्ग समजला तर वी चा अर्थ दोन होतात एक उलट आणि दुसरा अभाव.
स्मरण हा शब्द आहे त्याला व्ही हा उपसर्ग लावला तर तयार होतो विस्मरण , म्हणजे वी हा उपसर्ग मानला अर्थ होतो उलट आणि उलट हा स्वभाव मायेचा आहे उलट वागणं हा स्वभाव मायेचा आणि माया ही सगळं उलटच दाखवते खरं असलेलं खोटं आणि खोटं असलेलं खरं संसार खोटा आहे पण माझ्यामुळे तो खरं वाटतो आणि अशी ही माया पण मायला सुद्धा ज्यानं ठोबा केला अक्कल शून्य केलं तो विठोबा माया सुद्धा ज्याच्या ताब्यात आहे कारण देवाने केलेला अक्कलशून्य बनवला आहे म्हणून तर तुकाराम महाराज यांच्याकडेच मागणी करतात
अनिक नलगे माईक पदार्थ !तेथे माझे अर्थ नको देवा.!!
व्ही या शब्दाच्या उपसर्गाचा दुसरा अर्थ अभाव भक्ताला कोणत्याही प्रकारचा अभाव जो घडू देत नाही त्यांचा योगक्षेम स्वतः चालवतो तो विठोबा
योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी ! वाट दावे करी धरूनिया!!
म्हणून त्याला विठोबा म्हणायचे असे हे भगवंताचे नाम असूनही तुम्ही का घेत नाहीत हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
का रे नेना त्याचे नाव ! काय वेदांची नाही खावे !!
विठोबा रखुमाई _विठोबा रखुमाई_
तुकोबाराय म्हणतात असा हा विठोबा या नावाचा अर्थ वेदांमध्ये सुद्धा सापडतो मग तुम्ही का घेत नाहीत एक लक्षात घ्या,
१) काही नाव घेतल्यावर कसलाच परिणाम साधत नाही.
२) काही नाव घेतल्यावर किंचित परिणाम साधतो.
३) काही नाव घेतल्यानंतर मात्र जन्मोजन्मीच्या भाग्याचा परिणाम साध्य होतो.
१)काही नाव घेतल्यानंतर कसलाच परिणाम साधत नाही उदाहरणार्थ तुमची आमची नावे घेतल्याने कसलाच परिणाम नाही.
२) पण चिंचेचे नाव घेतले तर किंचित परिणाम साध्य होतो व्यवहारातील मोठ्या माणसाचं नाव घेतल्यानंतर थोडाफार परिणाम प्राप्त होतो पण जन्मभराचा परिणाम साधत नाही.
सर्वांना माहितीचा प्रसंग भोज राजा याच्या पदरी प्रसिद्ध हुशार बुद्धिमान कालिदासजी होते ते एकदा काही कारणास्तव परदेशी गेले तेव्हा राज्याचा पंडित नाहीये असं समजल्यावर शेजारील राज्याचा पंडित आला व भोज राजाला शास्त्रवाद करायला सांगू लागला अमुक दिवसाच्या मुक्ताधिक वेळ सांगून तो पंडित निघून गेला भोजराजचा पंडित कालिदास तर कोणालाच न सांगता आज्ञास्थळी गेले होते त्यामुळे भोज राजा काय करावं या काळजीमध्ये असताना एका दिवशी रस्त्याने चालत असताना एक डोळा नसलेला गंगू तेलन राजाला पाहिलं त्याने सहज विचारलं राज साहेब काय झालं राजेंना सांगितला रे शेजारील राज्याचा पंडित शास्त्रवाद करायला येतोय पण आपल्याकडे तर पंडित कालिदाजी नाही येत ना गंगू तेलंग सांगितलं काळजीच कारण नाही त्याला सांगा कालिदासजी नाहीत पण कालिदासाची गुरु आपल्या नक्की घालतील अरे पण गुरु कोण गंगुतेली म्हणायला मी राजाने कळवलं तसं तिकडं पंडित विचार करतो कालिदास इतका हुशार तर त्याचे गुरु किती हुशार पण आव्हान दिल्या जावंच लागेल गंगू तेली नकली बनावट गुरु भरून आले येताना स्वतःच्या जेवणासाठी दह्याचे गाडगे आणि सात भाकरी आणल्या वाद सुरू झाला पंडिताने एक बोट पुढे केलं गंगू तेल आणि दोन बोटं पुढे केली पंडितांना पाच बोट वर केले गंगुतेला मूड दाखवली पंडितांना साथ बूट वर केले यांना सात बूट वर करून मध्ये रेष ओढली पंडितांनी इशारा केला हाताने कुठे आहे याने दह्याचे गाडगे वर केलं तसा वाद संपला पंडित बोलला मी हरलो राजाला आनंद झाला तुमचा वाद आम्हाला कळू द्या अशी विनंती राजानं पंडिताला आणि केल्याबरोबर पंडित म्हणाला राजसाहेब मी एक बोट वर केलं कारण या जगात एक ब्रह्म आहे तर कवी कालिदाजींच्या गुरुजींनी दोन बोटं वर केले ते म्हणतात फक्त ब्रह्म नाही तर ब्रह्म सोबत माया सुद्धा आहे राजसाहेब मी पाच बोटीवर केली या जगात व शरीरात पंचमहाभूते आहेत तर तुमच्या पंडितांच्या गुरुजींनी मूड दाखवत सांगितलं की पंचमहाभूते आहेत पण ती एकत्र आणतात नंतर मी प्रश्न केला साथ समुद्र आहेत गुरुजींनी सांगितलं सात समुद्र आहेत पण मध्ये एकमेव पर्वत आहे मी कुठे आहे म्हणून विचारलं तर त्यांनी दह्याचे गाडगे दाखवलं म्हणजे नदी समुद्राजवळ आणि अशा रीतीने तुमचे कवी कालिदास यांचे गुरु शास्त्रवादामध्ये जिंकले असं उत्तर देऊन सांगून पण राज्यातल्या पंडित निघून गेला विचारलं तू कुठे शिकला रे एवढे शास्त्र गंगू तेल आणि सांगितलं राज साहेब मी कुठलं शिकतोय त्याने एक बोट वर केलं मला वाटलं तो म्हणतो तुझा एक डोळा आंधळा आहे व एक राहिलेला पुढील म्हणून मी दोन बोटे वर करून सांगितलं तुझे दोन्ही डोळे मी पडतो त्याने पाच बोटे मला दाखवली मला वाटलं चापट मारतो काय म्हणून मी त्याला म्हटलं तू चापट मारशील तर मी बुक्की घालीन त्यांना सात बोटं वर केली मी त्याला साथ भाकऱ्या खातोय पण एकावेळी खात नाही म्हणून त्याला सांगितलं सकाळी साडेतीन अर्धी साडेतीन करण्यासाठी मी मध्यभागी रेस दाखवली आणि त्याने कुठे आहे मग कशाबरोबर खातो असे विचारले तुम्ही बरोबर खातो असं सांगितलं ऐका असं काहीच नाव घेतल्यावर किंचित परिणाम साध्य होतो मोठ्या लोकांचे नाव घेतले तर त्या मोठ्या लोकांच्या नावावर काही परिणाम या निमित्ताने साध्य होत असतो पण तो किंचितच परिणाम असतो.
३) काहींची नावे घेतल्यावर मात्र अंतकरणांमध्ये जन्मोजन्मीचा परिणाम होतो जन्मोजन्मीच भाग्य उदयाला येत असतो याला उदाहरण महाभारतातील गोड दिले जाते एकदा धर्मराज दादाला वाटू लागले की आज जेवणासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सोबत असला पाहिजे म्हणून ताठे वाढायला सुरुवात झाली आणि तेवढ्या मध्ये धर्मराज्याचे चेहरा पडला अर्जुन आणि विचारलं दादा काय झालं धर्मराज कृष्ण परमात्मा जेवायला सोबत असावं वाटलं होतं पण कसा येणार हे भिमान ऐकलं आणि भिमान सांगितलं दादा काळजी करू नको सात वाजेपर्यंत मी देवाला विचार पण जमेल कसं मी आणतो आणि भीम दादा बाहेर गेला आणि भिमान आपली गरज उंच आकाशात फेकली आणि जोरात नाव घेतलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेथे असतील तेथे आणि वरची गदा झेलून मला वाचव नाहीतर तुझा फक्त भीम हा मेलास म्हणून समज आणि जेव्हा गदा असा भिमाच्या डोक्यावर पडायला लागला तेवढ्यात कृष्ण परमात्माला आणि कृष्णाने वर्षभर झेलली आणि विचारले भीमा असं का भीमाने सांगितलं काही नाही देवा तुला बोलवायचं होतं कशासाठी निमंत्रण द्यायचं होतं कसलं निमंत्रण आमच्या घरी जेवायचं कृष्ण म्हटला अरे हे जेवणाचे निमंत्रण द्यायची काय पद्धत आहे का असं हे भगवंताचं नाम घेतल्यानंतर लगेच परिणाम साध्य होत अंतकरणात आणि देव तुम्हाला भेटायला येतो असे भगवंताचे नाव असल्यामुळे त्याची स्तुती करावी अहो शेषेलाही वाटलं आपण स्तुती करावी म्हणून शेष स्तुती करायला लागला एक तोंड नाही तर त्याला हजारो तोंड आहे तरीपण स्तुती पूर्ण झाली नाही त्याच्या जिव्हा म्हणजे जीवा चिरल्या आणि मग काहीतरी देवाची सेवा करावी म्हणून तो शेषा पलंग झाला हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरण सांगतात.
शेष स्तुती प्रवर्तला !जीवा चिरोनी पलंग झाला!!
ज्याची स्तुती करता करता शिशेच्या जीवात चिडल्या व शिष्य हा स्वतः पलंग होऊन सेवा करू लागला असा हा भगवान परमात्मा आहे त्याचाच तुम्ही स्मरण केलं पाहिजे तेव्हा एक जण विचारू लागला की महाराज तुम्ही ज्याचं एवढं वर्णन करतात त्याचा अधिकार त्याचे सामर्थ्याची सत्ता तरी काय आहे याचे उत्तर देताना जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.
तुका म्हणे सत्ता ! ज्याची काळाचीये माथा!!
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
