करकंब येथे सद्गुरू श्री हभप डॉ.जयवंत महाराज बोधले यांची तीन दिवसीय प्रवचनमाला..



करकंब:- प्रतिवर्षाप्रमाणे श्री सद्गुरू भजलिंग महाराज मठ करकंब येथे चंदन उटी निमित्ताने श्री सद्गुरू माणकोजी महाराज यांचे वंशज श्री.ह.भ.प.जयवंत महाराज बोधले यांच्या अमृत रसाळ वाणीतून नाम  महात्म्य या विषयावर तीन दिवसीय प्रवचनमाला दिनांक २८ एप्रिल ते ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ते ८ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

ह.भ.प.जयवंत महाराज यांची प्रवचनमाला भारतात बरोबर परदेशातही मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येते.करकंब करांना मात्र सद्गुरू भजलिंग महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ही प्रवचनमाला सहजासहजी श्रवण करण्यास मिळत असताना सर्व करकंबकर आणि करकंब पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री सद्गुरू भजलिंग महाराज मठाचे अध्यक्ष बाळासाहेब वास्ते आणि विश्वस्त राजू देशपांडे.संजय दुधाणे.विद्याताई वास्ते.चंद्रकांत वास्ते मंडळी यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version