कर्मातील फळाची आसक्ती सोडून दिली की मोक्ष प्राप्त होतो = हभप डॉ जयवंत महाराज बोधले

सोलापूर येथील श्री निर्मलकुमार फडकुले सभागृह मध्ये आयोजित त्रिदिवसीय प्रवचन मालेतील सांगतेच्या प्रवचन मध्ये हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांनी ज्यांनी जीवनात कर्म करताना फळाची आसक्ती सोडून दिली तोच मोक्षाला प्राप्त होतो असे प्रतिपादन केले.

श्री बोधराज प्रतिष्ठान सोलापूर आयोजित प्रवचन माळेचा तिसऱ्या दिवसाची अर्थातच सांगतेच्या प्रवचन ची प्रारंभी श्री संत सद्गुरू माणकोजी बोधले महाराज यांचे विद्यमान वंशज श्री सद्गुरू हभप प्रभाकरदादा बोधले महाराज , अखिल भारतीय वारकरी मंडळाचे कर्नाटक राज्य अध्यक्ष श्री हभप यशवंत महाराज बोधले, धनश्री पतसंस्थेचे प्रमुख श्री शिवाजीराव काळुंगे सर , हभप लक्ष्मण महाराज चव्हाण ,श्री विलास कोकीटकर आदी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांनी कर्मातील कर्तव्यता म्हणजेच हे कर्म मीच करतोय हा अंहकार बाजूला करणे हा कर्मयोग असल्याचे सांगत , कर्मातील फळाची आसक्ती दूर करणे , कर्म करत असताना ते सर्व कर्म देवाला अर्पण करून कर्म करणे म्हणजेच कर्मयोग आहे तर केलेले सर्व कर्म समत्व बुद्धीने असेल तर ते देवाच्या आवडीचा कर्मयोग असल्याचे सांगितले.

कर्मयोग अर्जुनाला समजावून सांगताना श्रीकृष्णाने सांगितले की ,हे अर्जुना तू फक्त कर्म कर.. मी माझ्या बंधूंना, श्रीगुरु यांना कसे मारू ? हा प्रश्नच तुझा चुकीचा आहे कारण मारणारा तू आहेस तरी कोण ? तू म्हणतोस ना अर्जुना मी मारणार तर आधी तू मी चा शोध घे …अर्जुना तू त्यांना मारणार म्हणतोस पण नक्की काय मारणार त्याच्या देहाला मारणार का आत्म्याला मारणार…देहाला म्हणत असशील तर अर्जुना देह कधीतरी जाणारच आहे , तू नाही मारलेस तरी एकदिवशी ते स्वभावतः नष्ट होईल म्हणजे तू देहाला मारू शकत नाहीस आणि आत्म्याला मारणार असे म्हणत असशील तर आत्मा कधीचं मरत नाही त्यामुळे तुझी शंका बाजूला ठेवून अर्जुना तू युद्ध कर…

भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ,हे अर्जुना तू तुझे स्वकर्म निष्काम भावनेने केले पाहिजे कारण ते स्वकर्म निष्मकता अनुसरले ते कैवल्य पदी पातले या जगी !! , अर्जुना तू जर निष्काम भावनेने स्वकर्म केले तर कैवल्य पदी म्हणजेच मोक्षाला प्राप्त होशील ,असे सांगत कर्मयोगाची सांगता केली.

यावेळी हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांनी माणसाच्या जीवनात सरते शेवटी वर देवाच्या कोर्टात उभे राहिल्यानंतर आपल्या बाजून साक्ष देऊन आपणाला सोडवणारे फक्त स्वकर्म असते बाकीचे काही उपयोगी येत नाही हे सांगताना सुंदर दृष्टांत देताना म्हणले की प्रत्येक माणसाला ३ ( तीन ) मित्र असतात त्यापैकी आपण दोघांवरती खूप प्रेम करतो आणि तिसऱ्यावरती आपण प्रेम करत नाही पण त्याचे आपल्यावर प्रेम असते आणि एकदिवशी याच माणसांकडून काही तरी अपराध घडतो आणि त्याची कोर्टात सुनावणी लागते तेंव्हा कोर्ट सांगते कोणीतरी तुज्या बाजूने साक्ष देणार घेऊन ये तेव्हा तो आपल्या पहिल्या दोन मित्रांकडे जातो ज्याच्यावर हा खूप प्रेम करत असतो पण त्यातील एक सांगतो बाबा मी घर सोडून बाहेर नाही येऊन शकत तर दुसरा म्हणतो मी घर सोडून बाहेर येईन पण कोर्टाच्या पायरी पर्यंत राहीन कोर्टाच्या आत नाही येणार.शेवटी तो नाईलाजाने तिसऱ्या मित्राकडे जातो तेव्हा तो तिसरा मित्र म्हणतो की, मी सोबत ही येतो, कोर्टात ही येतो आणि तुझ्या बाजूने साक्ष देऊन तुला सोडवण्याच्या शेवटपर्यंत प्रयत्न करेन ..यावेळी जयवंत महाराज बोधले यांनी सांगितले की पहिला मित्र जो घर सोडणार नाही म्हणतो तो म्हणजे आपण कमावलेला पैसा , संपत्ती आहे तो आपण मेल्यानंतर घरातच राहतो सोबत येत नाही , दुसरा मित्र म्हणजे नातेवाईक जे फक्त कोर्टाच्या दारात म्हणजे स्मशान भूमी पर्यंतच येतो पण तिसरा मित्र म्हणजे हे स्वकर्म अर्थातच सत्कर्मच आहे जे शेवट पर्यंत आपल्याला सोबत राहते म्हणून मानवी जीवनात चांगले कर्म करा हाच खरा कर्मयोग आहे .यावेळी पूर्ण सभागृह भाविक श्रोते यांच्या उपस्थितीने तुडुंब भरलेले होते गेले तीन दिवस सोलापूरकर भाविक उस्फुर्त प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे

प्रवचन माळेचा सांगता श्री सद्गुरू प्रभाकरदादा बोधले महाराज यांच्या आशीर्वाचने झाली .पुढील वर्षी सुद्धा लवकरच अशी प्रवचन माला घेण्यात यावी अशी भावना सर्व सामान्य श्रोते उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपसात चर्चा करत असल्याचे दिसून येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version