निराळे वस्ती विठ्ठल मंदिर येथे वैकुंठवासी सावता बाबा जांभळे यांच्या प्रेरणेने दोन मार्चपासून दररोज सायंकाळी चार ते सहा या दरम्यान रामायण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे ह भ प दत्तात्रय महाराज शिंदे हे रामायण कथा निरूपण करीत आहेत. रामायण कथा सोहळ्यामध्ये विवाह सोहळा विषय होता. त्यानिमित्त शुक्रवारी दुपारी दोन पासून तापमानाचा पारा 43° च्या पुढे गेला होता. सायंकाळी चार नंतर हवेत ढग जमत होते. पाऊस अधून मधून पडत होता आणि इकडे निराळे वस्तीत मात्र टाळ मृदंगाचा निनाद होता. राम कृष्ण हरीचा गजर होता. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दुपारपासूनच विवाह सोहळ्याला रामभक्त मंडळीची गर्दी होऊ लागली.दुपारी चार वाजता प्रभू श्रीरामचंद्रांच्या व सीता मातेच्या मूर्तीची व 56 भोग पदार्थ माता-भगिनी डोक्यावर घेऊन दिंडी मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण परिसरामध्ये प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय हा जयजयकार होत होता.सायंकाळी सहा वाजून 36 मिनिटांनी या गोरज मुहूर्तावर रामेश्वर शहाणे व नम्रता शहाणे हे दोघेजण प्रभू श्रीराम व माता सीता देवीच्या वेशभूषा मध्ये मंचावर आले. आणि अभिजीत तेरकर या भटजींनी विधीवत धार्मिक वेद मंत्र उपचारांमध्ये विवाह सोहळा लावला.
विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. लाडू भात आमटी जिलेबी असे स्नेहभोजन होते. मंदिरासमोर या विवाह सोहळ्यासाठी मंडप उभा करण्यात आला होता.मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती.अनुपम्य नयनरम्य असा हा प्रभू श्रीरामचंद्र आणि माता जानकी सीता देवी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला परिसरातील माता भगिनींची संख्या ही लक्षणीय होती
या विवाह सोहळ्याला ह भ प लक्ष्मण महाराज चव्हाण, निळोबा महाराज जांभळे, नामदेव महाराज देवकते, दत्तात्रय महाराज शिंदे, युवा नेते ज्ञानेश्वर आप्पासाहेब सपाटे, चंद्रकांत महाराज लोकरे, पांडुरंग महाराज जांभळे, भागवत महाराज देवकते, सौदागरमामा सावंत, कालिदास भोसले, अनिल शिंदे, विजय बोरुळे, त्रिंबक ताटे, संजय शिंदे, रविकांत मगर, दत्तात्रय शेंडगे, विष्णु शिंदे,विष्णू गायकवाड, सागर शिंदे, गणेश व्यवहारे, महेश लोहकरे, नागेश शिंदे, परिसरातील वारकरी माळकरी नागरिक सर्व माता भगिनी उपस्थित होत्या
