Oplus_131072


आशिया कपमध्ये भारताचा पहिला सामना युएईविरुद्ध रंगला. या सामन्याच्या सुरुवातीलाच हार्दिक पंड्याने मोठी चूक केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने भर मैदानातच हार्दिकला कडक शिक्षा दिली.

सामन्याच्या सुरुवातीला सूर्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. जसप्रीत बुमराहसारखा अव्वल गोलंदाज संघात असतानाही सूर्याने पहिल्या षटकाची जबाबदारी हार्दिक पंड्याला दिली. हार्दिकसाठी ही सुवर्णसंधी होती. पहिल्या तीन चेंडूंवर त्याने नियंत्रण दाखवले, मात्र चौथ्या चेंडूवर ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकताच चौकार गेला. लगेच पुढील चेंडूवरही त्याच्याकडून तीच चूक झाली आणि पुन्हा चौकार बसला.

हार्दिकला सांगूनही त्याने आपली चूक सुधारली नाही. ही गोष्ट लक्षात येताच कर्णधार सूर्यकुमार यादवने निर्णायक पाऊल उचलले. त्याने हार्दिकची गोलंदाजी लगेच बंद करून त्याच्या जागी फिरकीपटूंना संधी दिली. सूर्याचा हा निर्णय अचूक ठरला आणि भारताला लवकर विकेट्स मिळायला लागल्या.

या घटनेतून स्पष्ट झाले की, सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून कुठल्याही चुकीला मैदानावर माफ करत नाही आणि संघहिताला नेहमी प्राधान्य देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version